कांदा पळवताे अनेक आजार...

    13-Sep-2023
Total Views |
 
 
 

onion 
अमेरिकेच्या हृदय संघटनेनुसार, कांद्यामुळे रक्ताच्या गाठी हाेण्यास प्रतिबंध हाेताे. कांदा उच्च रक्तदाब नियंत्रित करताे. कांद्याचं नियमित सेवन केल्याने दम्याच्या रुग्णांनाही ायदा हाेताे. श्वासनलिका आणि ुफ्ुसांना आलेली सूजही कमी व्हायला मदत हाेते. कच्च्या कांद्याचं सेवन केल्याने ताेंडात असणारे जंतू मरतात आणि दात दुखणंही कमी हाेतं. जागतिक आराेग्य संघटनेनेही कांद्याच्या सेवनाने भूक वाढते, यावर शिक्कामाेर्तब केले आहे. कांदा आणि पुदिन्याची चटणी उन्हाळ्यात तहान भागवते आणि उत्तम पाचक म्हणूनही काम करते. कांदा कापून खाेलीत टांगल्याने डास, किटाणू दूर पळतात व व्हायरल बॅक्टेरियापासूनही संरक्षण मिळते. ज्या व्यक्तींना संडास करताना त्रास हाेताे, आग हाेते अशा व्यक्तींनी कांद्याचं सेवन केल्याने आग हाेणं थांबतं.
 
कान दुखत असेल तर कांद्याच्या रसाचे दाेन थेंब टाकल्याने कान दुखणं थांबतं. घसा खवखवत असेल तर पाण्यात कांदा उकळवून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. भाजल्यास त्या ठिकाणी कांद्याचा रस चाेळावा. त्यामुळे आग तर कमी हाेतेच, शिवाय जखम लवकर भरून येण्यासही मदत हाेते. महिलांना जर अनियमित मासिक पाळीचा त्रास हाेत असेल तर त्यांनी मासिक पाळी येण्याआधी 3-4 दिवस नियमितपणे कांदा खावा. मासिक पाळी नियमित हाेण्यास मदत हाेईल. कांद्याचं सेवन गूळ आणि पाण्याबराेबर केले असता शरीरातील रक्ताची कमतरता दूर हाेते. पाेटाचा कॅन्सर आणि महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर राेखण्यासाठी कांदा हे एक उत्तम औषध आहे. तेव्हा अशा या बहुगुणी कांद्याचं खूप सेवन करा आणि अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करा...