अतिश्रीमंतांच्या जीवनशैलीची उत्सुकता मात्र असते. त्या लाेकांचे राहणीमान, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे प्रवास आदींबाबत सतत काही ना काही माहिती प्रसिद्ध हाेते. जगात अशा अब्जाधीशांची संख्या कमी नाही.भारताचा विचार केला, तर गाैतम अदानी, मुकेश अंबानी, रतन टाटा अशी नावे डाेळ्यांपुढे येतात. त्यांच्याकडे अत्यंत महाग आणि आलिशान गाड्यांचे ताफे आहेत, बंगले आहेत, खासगी विमाने आहेत आणि याटसुद्धा.जलप्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या याट अनेक नावांनी ओळखल्या जातात. सुपरयाट किंवा मेगायाट ही त्याची उदाहरणे. या नाैकांवर सर्व आधुनिक सुविधा असतात आणि त्यांची मालकी हे सध्याचे ‘स्टेटस सिम्बाॅल’ झाले आहे. भारतातील काही बड्या उद्याेजकांकडे अशा याट आहेत.
सर्वांत महाग याटच्या यादीत पाेलाद सम्राट लक्ष्मी मित्तल अव्वल असून, त्यांच्या ‘अमेवी सुपरयाट’ची किंमत आहे सुमारे एक हजार काेटी रुपये. 262 मीटर लांबीच्या या नाैकेवर पाेहण्याचा तलाव, व्यायामशाळा, स्पा आणि चित्रपटगृहआहे. याटच्या सजावटीसाठी प्रख्यात असलेल्या अल्बर्टाे पिंटाे या डिझायनरने या याटच्या अंतर्भागाची सजावट केली असून, याटवर 16 जण राहू शकतात.त्यावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आठ खाेल्या आहेत. ही याट चालविण्यासाठी वीस कर्मचारी तैनात केले गेले आहेत.भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे घाेड्याच्या नालेच्या आकाराचे (हाॅर्सशूशेप्ड) आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त याट असून, त्याची किंमत सुमारे 100 दशलक्ष डाॅलर आहे. 58 मीटर लांबीच्या या याटवर खासगी खाेल्या, स्पा, 25 मीटर लांबीचा पाेहण्याचा तलाव आणि लाउंज बार आहेत.
मुकेश यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्याकडे ‘टीआन’ नावाचे याट असून, त्याची किंमत दाेनशे काेटी रुपये असल्याचे सांगितले जाते. उद्याेजक विजय मल्ल्या यांच्याकडे पूर्वी ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ नावाची याट हाेती.त्याची किंमत माहिती नसली, तरी ती 2006मध्ये घेण्यात आली हाेती. 95 मीटर लांबीचे ही याट आपण 2018मध्ये 43 काेटी रुपयांना विकल्याचे मल्ल्या सांगतात. गाैतमसिंघानिया आणि अदी गाेदरेज या भारतीय उद्याेजकांकडेसुद्धा याट आहेत.दुबईतील अब्जाधीश आणि ‘स्टॅलियन ग्रुप’चे प्रमुख सुनील वासवानी यांच्याकडेही आलिशान याट आहे.‘रेमण्ड ग्रुप’चे प्रमुख गाैतम सिंघानिया यांच्याकडे ‘एमवाय आशेना’ या नावाची आलिशान याट असून, म्यानमारमधून आणलेल्या सागवानी लाकडापासून ती बांधण्यात आली आहे. या याटला तीन डेक असून, तिची किंमत 51 काेटी रुपये आहे.