अधिक मसालेदार चिप्स खाल्ल्याने अमेरिकेत मुलाचा मृत्यू

    12-Sep-2023
Total Views |
 


USA
 
 
 
साेशल मीडियावर दरराेज काेणते ना काेणते चॅलेंज व्हायरल हाेत असतात. काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षांच्या मुलाचा ‘वन चिप चॅलेंज’मुळे मृत्यू झाला. वास्तविक, साेशल मीडियावर व्हायरल हाेणारे हे चॅलेंज धाेकादायक आहेत. मात्र काही लाेक जीवन- मरणाचा विचार न करता ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.‘वन चिप चॅलेंज’ पूर्ण करण्याच्या नादात अनेक लाेकांनी जीव गमावला आहे. आता हे चॅलेंज पूर्ण करण्यात अमेरिकेचा एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.मुलाचा मृत्यू कसा झाला? चॅलेंज पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्समध्ये एक 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुसार, मृत मुलगा गेल्या आठवड्यात वन चिप चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत हाेता.मुलाच्या कुटुंबाचा आराेप आहे, की त्याचा मृत्यू साेशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चॅलेंजमुळे झाला आहे.
 
मुलाने ‘वन चिप चॅलेंज’मध्ये घेतला भाग वन चिप चॅलेंज साेशल मीडियावर व्हायरलझालेले एक चॅलेंज आहे. यात जगातील सर्वांत मसालेदार चिप्स खावे लागतात. मृत मुलानेही हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.त्याने जगातील सर्वांत मसालेदार चिप्स खाल्ले, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ताे इयत्ता दहावीचा विद्यार्थी हाेता. मुलाचे नाव हॅरिस व्हाेलाेबा असे आहे. ज्या दिवशी त्याने हे चॅलेंज पूर्ण केले, त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.हॅरिसची आई म्हणाली, की शाळेत खूप मसालेदार चिप्स खाल्ल्यानंतर मुलाचे पाेट दुखू लागले. त्यानंतर त्याला दवाखान्यात दाखल केले. त्याची तब्येत सुधारली हाेती. मात्र, दवाखान्यातून परतताना त्याची तब्येत पुन्हा बिघडली आणि त्याला दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डाॅ्नटर म्हणाले, की शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल.