मुलांच्या स्वास्थ्यावर हाेऊ नये टी.व्ही.चा प्रतिकूल परिणाम

    12-Sep-2023
Total Views |
 
 
 
 
TV
 
 मुले जेव्हा अधिक वेळापर्यंत टी.व्ही. पाहतात तेव्हा त्यांच्या डाेळ्यांच्या स्नायूपेशींवर प्रतिकूलप्रभाव पडताे.
 
 डाेळे जेव्हा सामान्यपेक्षा अधिक प्रकाशाच्या क्षेत्रात येतात तेव्हा डाेळे प्रकाश झेलू शकत नाहीत आणि पापण्या लवताच डाेळे बंद हाेतात.
 
 मुले जर टक लावून अधिक वेळ टी.व्ही. पाहत असतील तर डाेळ्यांवर याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकताे. म्हणूनच मुले ज्या खाेलीमध्ये टी.व्ही. पाहत असतील, त्या खाेलीची साइज टी.व्ही.च्या स्क्रीनपेक्षा वीस पट अधिक असावी.
 
 टी.व्ही पाहताना मुलांना अशा प्रकारे बसवावे की डाेळ्यांवर काेणताच अतिर्नित दबाव पडणार नाही. टी.व्ही. पाहताना खाेलीमध्ये अंधार करू नये.अन्यथा डाेळ्यांवर अधिक दबाव पडू शकताे.
 
 मुलांना अनावश्यक आणि अत्याधिक टि.व्ही. पाहू देऊ नये. श्नयताे त्यांना लहान मुलांचे कार्यक्रमच पाहावयास द्यावेत.टी.व्हीची स्क्रीन एखाद्या मऊ कपड्याने साफ करावी. टी.व्ही.ची स्क्रीन खराब झाल्यास त्वरित बदलावी.
 
 टी.व्ही. सहा ते सात फुटाच्या अंतरावर ठेवावा. टी.वी. सलग अधिक वेळ पाहू नये तर मधून- मधून ब्रेक घ्यावा. याने डाेळ्यांना आराम मिळेल.