काेराेना काळात शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. पण, आता काेराेनाचा प्रभाव संपूनही मुलांना शाळेत जाण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी राेबाेट प्राॅ्नसी स्वरूपात शाळेत हजेरी लावणार आहे व याची सुरुवात कुमामाेटा शहरापासून झाली आहे.या शहरातील प्रत्येक शाळेत मायक्राेफाेन, स्पीकर, कॅमेरे आदी व्यवस्था करण्यात आली असून, विद्यार्थ्यांर्च्या वतीने राेबाेट वर्गात हजर राहणार आहे.या राेबाेटद्वारे विद्यार्थी शाळेत व्हर्च्युअल हजेरी लावतील. हा राेबाेट एक मीटर उंच असून, ताे मायक्राेफाेन, स्पीकर आणि कॅमेऱ्याने सुसज्ज असेल.ही प्राॅ्नसी पद्धत जपानमध्ये नाेव्हेंबर 2023 पासून सुरू हाेणार आहे. अशी माहिती कुमामाेटाे शहराचे महापाैर काजुकुमी ओनिशी यांनी दिली. जे विद्यार्थी शाळेत जायला तयार नाहीत, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापाैर म्हणाले.