मत्सर साेडा, सहकार्याची भावना ठेवा

    12-Sep-2023
Total Views |
 
 

Happy 
 
मत्सरभावनेतून कुणाचीच प्रगती हाेत नाही. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्ही मत्सर करता त्या व्यक्तीला तर अनेकदा त्याची कल्पनाही नसते.काही वेळा तर ती व्यक्ती या सगळ्यांच्या इतकी पलीकडे गेलेली असते की तुम्ही त्या व्यक्तीचा मत्सर केला तरी काहीही फरक पडत नसताे.त्यामुळे मत्सरभावना साेडून सगळ्यांशी सहकार्याचे धाेरण ठेवा. मत्सरातून काहीही साध्य हाेत नाही.
 
कामात व्यस्त राहा: मत्सरापासून दूर राहण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे कामात व्यस्त राहणे. कामातील व्यस्तपणामुळे मत्सराचा विचारही मनात येऊ शकत नाही. त्याचबराेबर ावल्या वेळात खेळ, चित्रकला, बागकाम, नेट ब्राऊझिंग, मित्र-मैत्रिणींशी गप्पा, प्रवास, आवडता चित्रपट पाहणे, टीव्ही पाहणे यांत घालवा. जेव्हा कधी मत्सराचा विचार मनात येईल तेव्हा लगेच अशा गाेष्टींमध्ये स्वतःला गुंतवा. जेणेकरून तुम्हांला आनंदी वाटेल.
 
ईर्ष्या करू नका:मत्सरभावना नेहमी नकारात्मक दृष्टीने पाहिली जाते.पण वेळीच मत्सरभावनेला याेग्य प्रकारे हाताळले तर त्या व्यक्तीमधील चांगल्या क्षमतांचा उपयाेग करून घेता येताे. दुसऱ्याच्या मत्सरातून आपण विधायक दृष्टीने कामाला लागलाे तर नक्कीच त्यातून चांगले रिझल्ट मिळतील. बहुतेकवेळा दुसऱ्याच्या श्रीमंतीमुळे आपल्याला मत्सर वाटत असताे. अशा मत्सराला याेग्य दिशा दिली तर प्रेरणा मिळून ती व्यक्ती खूप कष्ट करेल आणि त्यातून बाकीच्यांनी जे मिळवले आहे ते मिळवू शकेल.
 
मत्सर साेडा, आनंद वाटा: तुमच्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काेणतीही अशक्यप्राय वाटणारी गाेष्ट शक्य करू शकता असे सांगितले जाते ते अगदी खरे आहे. त्यामुळेच केवळ इच्छाशक्तीच्या जाेरावर तुम्ही मत्सरभावनेवर मात करू शकता. तुम्ही सतत तुमच्या मनाला बजावत राहा की, कुणाचाही मत्सर करायचा नाही, आपण आपले आयुष्य आनंदात जगायचे. असे करणे अवघड असले तरी सरावाने ते शक्य करता येऊ शकते. तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर मत्सरभावना नियंत्रणात ठेवू शकता.
 
तुमच्या क्षमता, व्यक्तिमत्त्व वेगळे; तुलना करण्यामुळे व्यक्ती कायम असमाधानी राहते. नेहमी आपण दाेन व्यक्तींची तुलना करताे किंवा अनेकदा स्वतःची इतरांशी तुलना करताे. बहुतेक वेळा तुलना केली जाते ती आपल्यापेक्षा जास्त काहीतरी असलेल्या व्यक्तीशी. असे करून आपण स्वतःला दुःखी बनवताे. या जगात एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते.त्यामुळे तुलना करून स्वतःला दुःखी करण्यात काहीच अर्थ नसताे.पैसा, संपत्ती या भाैतिक गाेष्टींत आपल्यापुढे असलेल्या व्यक्तींशी तुलना करण्यात काहीच अर्थ नसताे.