कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात राेजगाराच्या नव्या संधी

    12-Sep-2023
Total Views |
 


AI
 
 
तंत्रज्ञानाच्या आघाडीवर सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय चर्चेत आहे. विविध क्षेत्रांत तिचा वापर सुरू झाला असून, भविष्यात ती सगळ्याच क्षेत्रांत येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक विद्यमान राेजगार धाे्नयात येत असले, तरी नव्या संधीसुद्धा आहेत.जेनरेटिव्ह एआयमुळे राेजगाराची अनेक नवी क्षेत्रे खुली हाेत आहेत.गाेल्डमॅन अँड सॅ्नसच्या एका अहवालानुसार, जागतिक एकूण उत्पन्नात सात टक्के वाढ करण्याची एआय तंत्रज्ञानाची क्षमता आहे. त्याच वेळी राेजगाराच्या काही संधी जातील हेही खरे आहे.नव्या काळात राेजगारासाठी एआय तंत्रज्ञान माहिती असणे ही आवश्यक पात्रता राहणार असून, तरुणाईने ते समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते अभ्यासक्रम निवडून त्यांनी तयारी करणे याेग्य ठरेल.
सध्याच्या स्थितीत एआय जेनरेटिव्ह काैशल्यांना माेठी मागणी असून, आर्टिफिशल इंटेलिजन्स या माेठ्या विषयाच्या अंतर्गत किती कामांमध्ये तिचा वापर केला जाताे हे समजून घेतले पाहिजे.जेनरेटिव्ह एआय म्हणजे काय? नवा कंटेंट तयार करण्यासाठी वापरता येईल अशी अल्गाेरिदमची संरचना करणे म्हणजे जेनरेटिव्ह एआय. हा कंटेंट ऑडिओ, व्हिडिओ, काेड, इमेजेस, टे्नस्ट, सिम्युलेशनसारख्या विषयांबराेबर संबंधित असताे. डिप लर्निंगची ही वेगवेगळी माॅडेल आहेत. यात काेणत्याही डेटाच्या उत्तम वापरासाठी कृत्रिम न्यूरल नेटवर्कचा उपयाेग केला जाताे.
 एआयपूरक काैशल्ये समजून घ्या : ऑटाेमेशनच्या या काळात जेनरेटिव्ह एआयमुळे राेजगाराच्या नव्या संधीसुद्धा मिळत आहेत. त्याचे एक उदाहरण बघा. बहुसंख्य कंपन्या मार्केटिंगची धाेरणे आणि सेवा ग्राहकानुरूप तयार करण्यासाठी याचा वापर करत आहेत. त्यासाठी डेटा अ‍ॅनॅलिट्निस आणि इंटरप्रिटेशनसारख्या एआयपूरक काैशल्यांमध्ये प्रावीण्य मिळविणे उपयुक्त ठरते.
 साॅफ्ट स्किल्सचे महत्त्व : वारंवार करावी लागणारी कामे एआयमुळे स्वयंचलित करता येतात.डेटा एन्ट्री, डेटा अ‍ॅनॅलिसिस आणि रिपाेर्ट तयार करणे आदी. जी कामे स्वयंचलित पद्धतीने करणे श्नय नसते, त्यात काैशल्य मिळविणे यासाठी उपयुक्त ठरेल. क्रिटिकल थिंकिंग, रचनात्मकता आणि प्रश्नांवर उपाय शाेधणे ही काैशल्ये तुम्हाला उपयाेगी पडतील.
 एआय तांत्रिक काैशल्यांना मागणी : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत गेल्यावर तिच्याशी संबंधित काैशल्यांना मागणी वाढत जाईल. उदा.मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्राेसेसिंग आणि काॅम्प्युटर व्हिजन आदी.
संधींचा व्यापक परीघ : ‘टीम लिजडिजिटल’च्या अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सध्या सुमारे 45 हजार जाॅब्ज उपलब्ध आहेत. आराेग्यसेवा,शिक्षण, बँकिंग, मॅन्युफॅ्नचरिंग आणि रिटेल या क्षेत्रांत या तंत्रज्ञानाला अनुसरून राेजगार आहेत.राेजगारासाठी तरुणांनी स्वत:ला डेटा इंजिनीअरिंग, डेटा आर्किटे्नट्स, डेव्हऑप्स इंजिनीअर्स आणि एमएल इंजिनीअर्ससारख्या क्षेत्रांत तयार केले पाहिजे. एआयबराेबर संबंधित एखादे काैशल्य असणे फ्रेश ग्रॅज्युएट तरुणांना फायद्याचे ठरते. तुम्ही नाेकरदारर असाल, तर नव्या जगात टिकण्यासाठी ुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान मिळविणे आवश्यक ठरेल. त्यातून तुम्हाला नव्या संधी मिळतील.एआय प्रशिक्षक, एआय एथ्निस अँड गव्हर्नेस स्पेशालिस्ट्स, डेटा अ‍ॅनलिस्ट्स, एआय कस्टमर ए्नसपिरिअन्स स्पेशालिस्ट्स, एआय कंटेंट क्रिएटर्स आणि एआय हेल्थकेअर स्पेशालिस्ट्स ही जेनरेटिव्ह एआयमुळे उपलब्ध हाेणारी राेजगाराची नवी क्षेत्रे आहेत. एआयमधील काेणतेही काैशल्य तुम्हाला मदतीला येते.राेडमॅप कसा असावा? एआय क्षेत्रातील राेजगारासाठी कशी तयारी करावी याबाबत करिअर सल्लागार डाॅ. संजीव कुमार सी. यांनी तरुणाईला दिलेल्या टिप्स अशा :
 काॅम्प्युटर सायन्स किंवा आयटी इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन.
 गणित आणि स्टॅटेस्ट्निसचे ्निलष्ट सिद्धान्त समजून घेणे. एआय अल्गाेरिदमसाठी काॅम्प्युटेशनचे काैशल्य आवश्यक असल्याने प्राेग्रामिंग काैशल्य भक्कम करा. अल्गाेरिदम, डेटा स्ट्र्नचर्स आदींची पार्श्वभूमी असावी. सी ++ तसेच पायथनसारख्या साॅफ्टवेअर लँग्वेजमध्ये प्रावीण्य मिळवा.
 मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगचे काेर्स करावेत.जेनरेटिव्ह एआयमध्ये राेजगार हवा असेल, तर एखाद्या डाेमेनमध्ये प्रावीण्य मिळवा. त्यामुळे त्या क्षेत्रातील गरजा तुम्हाला समजतात. उदा.बायाेटेक, मार्केटिंग, बिझनेस अ‍ॅनालिसिस किंवा एचआर आदी.
 तुम्ही नाॅन टे्निनकल क्षेत्रात असाल, तर गणित आणि स्टॅटेस्ट्निसच्या आधारभूत सिद्धान्तांपासून प्रारंभ करा.प्राेग्रामिंग लँग्वेजेस शिका. डेटा सायन्स आणि डेटा मॅनेजमेंटचे काेर्सेस करा.डाेमेन क्षेत्रात काैशल्य मिळविल्यावरच नाेकरीसाठी अर्ज करा.
संधी अशा वाढवा...
 ऑनलाइन अभ्यास आणि ट्युटाेरियल्स : एआय किंवा जेनरेटिव्ह एआयबाबतची प्राथमिक काैशल्ये शिकविणारे अनेक अभ्यासक्रम आणि ट्युटाेरियल्स ऑनलाइन प्लॅटफाॅर्मवर असतात. त्यातून शिक्षण घ्या.
 हॅकथाॅनसारख्या स्पर्धांमध्ये सहभाग : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हॅकथाॅनसारखी स्पर्धा म्हणजे इतरांबराेबर संपर्क आणि आपले ज्ञान तपासण्याची उत्तम संधी असते.