दक्षिण ऑस्ट्रेलियातील मॅ्नलेरेन वेलमध्ये असलेले हे वाइन टेस्टिंग युनिट आहे. वाइन मेकर चेस्टर ऑसबाॅर्न यांची इच्छा हाेती, की वाइन टेस्टिंगचे काम करताना त्यांच्या सहकाऱ्यांना काेडे साेडविण्याची अनुभूती मिळावी. यासाठी त्यांनी त्यांच्या कंपनीचे कार्यालय रुबिक ्नयूबप्रमाणे डिझाइन केले. 2017 मध्ये निर्माण केलेली ही इमारत बांधण्यासाठी 100 काेटी रु. खर्च आला. ही 5 मजली इमारत बांधण्यासाठी डबल टेम्पर्ड ग्लास (काच) वापरण्यात आली आहे. 2018 मध्ये या बिझनेस बिल्डिंगला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.