बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश

    11-Sep-2023
Total Views |
 
 

Study 
 
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले हाेते.त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, त्याअंतर्गत अंधेरी पूर्वे तील काेल डाेंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूलमध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय याेजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली. लाेढा यांनी या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.मुंबई शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा, आवश्यक साेयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे इच्छा असतानाही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडथळे निर्माण हाेतात. त्यामुळे मुंबईत रात्र अभ्यासिकेची नितांत गरज हाेती. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे.
 
त्यानिमित्ताने शहरात 350 रात्र अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांत या अभ्यासिका सुरू हाेणार असून, त्याचा लाभ सुमारे 4 लाख विद्यार्थ्यांना हाेणार असल्याचे लाेढा यांनी सांगितले.महापालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या; तसेच परिसरातील खासगी शाळांत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येईल. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने पालिकेच्या शाळांत तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खाेली उपलब्ध असेल. अशा इमारतीतच 6 ते 8 या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येईल. प्रवेशासाठी पालकांकडून संमतिपत्र, विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे.