जाेडीदार निवडताना खरेपणाला तरुणाईची पसंती

    11-Sep-2023
Total Views |
 
 


Partner
 
 
 
प्रेम आंधळे असते, असे म्हणतात. पण आता हा विचार जुना झाला आहे. या बाबतीत आता ‘जेन झी’ (18 ते 26 वर्षांचे तरुण) जागृत झाले आहेत. जुन्या पिढीप्रमाणे आजची पिढी साैंदर्य आणि शरीरयष्टीला विशेष महत्त्व देत नाही, तर खरेपणाला प्राधान्य देतात.आजकाल तरुणी आयुष्याचा जाेडीदार म्हणून गाेरा, उंचापुरा आणि सुंदर तरुणाची निवड करत नाहीत. आपला जाेडीदार आपल्याशी प्रामाणिक व एकनिष्ठ असावा इतकीच तरुणींची माफक अपेक्षा असते.ही माहिती ‘डेटिंग नेटवर्किंग अ‍ॅप बंबल’च्या अहवालात देण्यात आली आहे.या सर्व्हेमध्ये 32 ट्नके तरुणांनी सांगितले, माझा जाेडीदार माझ्या अपेक्षांनुसार असेलच असे नाही.
याेग्य जाेडीदार मिळाला, तरच प्रेम हाेईल किंवा नाते जुळेल असे नाही.
 
कारण प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नाही. त्यामुळे सध्याच्या तरुण-तरुणी आपल्या अनुरूपच जाेडीदार हवा, अशी अपेक्षा करत नाहीत. माेकळेपणा तरुणांच्या तुलनेत तरुणींमध्ये जास्त असताे. 41 टक्के तरुणींनी मत व्यक्त केले, की आम्हाला चांगला जाेडीदार हवा.तरुणींच्या बाबतीत 37 टक्के तरुणांचेही असेच मत आहे.साधारण 52 टक्के तरुण म्हणाले, की आम्हाला अशी जाेडीदार हवी, जी प्रामाणिक व स्पष्टव्नती असावी. नाती टिकविण्यासाठी हीच अट महत्त्वाची आहे. आता जेन झी जाेडीदार पसंत करताना जास्त प्रामाणिक आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे ते प्रतिष्ठेला आव्हान देण्यास घाबरत नाहीत. ते त्यांच्या अटी व साेयीनुसार डेट करतात. नातेसंबंध व्हावेत यासाठी साेशल मीडियाची भूमिका महत्त्वाची आहे.
 
साधारण 27 टक्के तरुण म्हणाले, की ते त्यांच्या जाेडीदारासाठी साेशल मीडिया हँडलवर पाेस्ट करू इच्छितात, तर 23 टक्के तरुण म्हणतात, ‘आम्ही डेटच्या बाबतीत निर्णय घेताना पाहताे, की भावी जाेडीदाराची साेशल मीडियावर किती उपस्थिती आहे? सामाजिक अभ्यासक म्हणतात, की आता जेन झी पूर्वपार चालत आलेला परंपरेच्या आधारावर पुढे जाऊ इच्छित नाहीत, तर त्यासाठी स्वतःचे काही नियम, अटी तयार करत आहेत. ही पिढी आपल्या मनात काय आहे, ते स्पष्ट बाेलून दाखवणारी आहे. ते स्वतःलाही महत्त्व देतात. साधारण 50 टक्के तरुणांनी म्हटले आहे, की करिअर आणि प्रेमात संतुलन हे माेठे आव्हान आहे, तर 29 टक्के तरुणांनी नकार देणे अवघड जाते, असे म्हटले. जवळपास 33 टक्के तरुण म्हणाले, की आम्हाला विवाह करण्याची घाई नाही. त्यासाठी वयाची मर्यादा निश्चित करण्याची गरज नाही.