फेरफार केलेल्या इमेजेस ओळखण्यासाठी 5 टिप्स

    11-Sep-2023
Total Views |
 
 


Fake
 
 
इंटरनेटमुळे जग जवळ आले, एका ्निलकवर हवी ती माहिती मिळविणे आणि पाठविणे साेपे झाले हे खरे असले, तरी त्यात गैरप्रकारही वाढायला लागले आहेत. ‘माॅर्फड इमेजेस’ हा त्यातील एक. एखाद्याच्या प्रतिमेबराेबर छेडछाड करून, त्यात बदल करून वेगळीच प्रतिमा तयार करणे यात घडते. कुस्तीपटू विनेश फाेगट आणि संगीता फाेगट यांनाही त्याचा फटका बसला आहे. त्यांच्या मूळ फाेटाेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूलचा वापर करून या दाेघींच्या चेहऱ्यांवर हास्य निर्माण करण्यात आले हाेते.मात्र, दाेघींचे मूळ फाेटाे समाेर आल्यावर हे उघड झाले. इंटरनेटवरील एआय माॅर्फड इमेजेसचे हे एक उदाहरण आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे असे फाेटाे दिसतात. एआयचा प्रभाव वाढत असताना मानव आणि यंत्रातील फरक ओळखणे कठीण हाेत चालल्याने सावध राहण्याची गरज आहे.ऑनलाइन एआय माॅर्फड इमेजेस कशा ओळखाव्यात आणि खबरदारी काय घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स अशा :
 
तपशिलाकडे बारकाईने लक्ष देणे : सध्याच्या काळात ऑनलाइन उपलब्ध असलेल्या काेणत्याही गाेष्टीवर पूर्ण विश्वास ठेवणे श्नय नाही. आपल्याला आलेली इमेज खरी आहे की खाेटी हे ओळखता आले पाहिजे. त्यासाठी त्या इमेजचे तपशील बारकाईने तपासले पाहिजेत, असे एआय काैशल्याबराेबर संबंधित असलेल्या ‘सिखाे’ या प्लॅटफाॅर्मचे प्रमुख अरिहंत जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एआय माॅर्फड इमेज ओळखणे कठीण असले, तरी त्यासाठी काही मार्ग आहेत. संबंधित इमेजचे बारकाईने निरीक्षण करणे, त्यातील सावल्या आणि प्रकाशाची स्थिती पाहणे, यातून त्या इमेजबाबतची माहिती मिळते.माॅर्फिंग केलेली इमेज समजते. इमेजचे टे्नस्चर आणि पॅटर्नसही पाहिले पाहिजेत. या इमेजभाेवती काय आहे तेही तपासले पाहिजे. ही इमेज एखाद्या चेहऱ्याची असेल, तर त्याकडे अधिक लक्ष द्या. इमेजबराेबर छेडछाड झाली असेल, तर मूळ चेहरा आणि त्यातील बदल लक्षात येतात.’
 
लक्षात ठेवण्याचे मुद्दे :
 
 पार्श्वभूमीवरील विकृत चेहरे (डिटाॅर्टेड फेसेस) ही इमेज खरी नसल्याचे सांगतात.
 नेहमीपेक्षा वेगळा चेहरा, चमकदार त्वचा आणि नकाे एवढ्या टे्नस्चर ही एआय जनरेटेड इमेजची चिन्हे असतात.
 इमेजमधील व्यक्तीच्या हातांकडे लक्ष द्या.अनेकदा अशा इमेजेसमध्ये हात चुकीच्या पद्धतीने जाेडलेले दिसतात.
 फीड केलेल्या डेटानुसार अशा इमेजेस तयार हाेत असल्याने अनेकदा विचित्र पॅटर्न्स दिसतात.
 आपल्याला आलेल्या इमेजच्या स्राेताची खात्री करून घ्या.
 
‘रिव्हर्स इमेज सर्च’द्वारेसुद्धा संबंधित इमेजची खात्री करता येते. ताे फाेटाे ‘गुगल इमेजेस’सारख्या सर्च इंजिनवर अपलाेड करा किंवा ‘टीनआय’ अथवा ‘यांडे्नस’सारख्या टूल्सचा वापर करून इमेजच्या सत्यतेची खात्री करा.
 
एजेस तपासा : इमेजमधील लाेकांच्या फाेटाेंच्या एजेस तपासल्यानेही बरेच कळते. एआय जनरेटेड इमेजेसमधील वळणे हवी तशी नसल्याने ती इमेज खाेटी असल्याचे समजू शकते. इमेजचे तपशीलही अचूक नसतात. फाेटाेतील टे्नस्चर्स आणि पॅटर्नसही पाहिले पाहिजेत, असा जैन यांचा सल्ला आहे.
 
वाॅटरमार्ककडे लक्ष द्या : वाॅटरमार्ककडे लक्ष दिल्यामुळे एआय माॅर्फड इमेजेस कळू शकतात, असे ‘मड्रे्नस’ या कंपनीचे प्रमुख अलंकार स्नसेना यांनी सांगितले. बाैद्धिक संपदा सुरक्षित ठेवण्यासाठी कंटेंट क्रिएटर्स अथवा स्टाॅक इमेजेस वेबसाइट्सकडून वाॅटरमार्कचा वापर केला जाताे.