कदाचित आपणास हे माहीत नसेल की आपला दिवस आणि मूड आपल्या नाष्ट्यावर आधारित असताे. आपण जर असा विचार करीत असाल की सकाळी ऑफीसला जाण्याच्या घाईत नाष्ट्याविना बाहेर जाण्याने आपला बीएमआय म्हणजे बाॅडी मास इंडे्नस (शरीराच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणात चरबीचे मापन करणे) संतुलित राहताे, तर, असा विचार करणे याेग्य नाही.फाेर्टिज हाॅस्प्टिलचे कन्सल्टंट हर्ष सिधवा म्हणतात, सकाळच्या नाष्ट्यामध्ये आपण जर अंकुरित धान्ये घेत असाल तर हे शरीरासाठी अत्यंत चांगले आहे. चणे आणि शेंगदाणे, भिजवून खाण्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि याने भूकही वाढते. याचबराेबर नाष्ट्यामध्ये साेयाबीन, दूध आणि अंडे घेतल्यास अधिकच चांगले.नाष्टा करण्याने आपण दिवसभर चांगल्या प्रकारे काम करू शकताे. तसेच दुपारच्या वेळी जड भाेजन (लंच) घेण्याची आवश्यकता पडणार नाही.सकाळचा नाष्टा घेण्याने आपणास दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते व आपण दिवसभर अॅ्निटव्ह राहताे. म्हणूनच सकाळचा नाष्ता चूकवू नये.