आपल्या कानातून आवाज का येताे?

    31-Aug-2023
Total Views |
 
 

ear 
अंगात रक्त कमी असले (रक्तक्षय) तर तात्पुरता कानात आवाज येऊ लागताे.व्यक्ती िफकी दिसते, थकवा येताे, अशक्त हाेते. तुलनेने कमी श्रमाने धाप लागू शकते. नाडीची गती जलद असते. पाणी वहावे व थांबावे अशा प्रकारचा आवाज येत राहताे. असाच आवाज मानेतील कॅराेटिड रक्तवाहिन्यांच्या राेहिणी काठिण्यात येऊ लागताे. मानेतील रक्तवाहिनीवर दाब दिल्याने हा आवाज थांबू शकताे. मानेवर व कानाच्या पाळीवर स्टेथाेस्काेपने माेठा आवाज ऐकू येताे. या आवाजाबराेबरच मान कडक हाेते व मानेच्या हालचालींबराेबर मान कमी-जास्त दुखते.
 
बऱ्याच व्यक्तींना चक्कर येणे, ताेल जाणे असे त्रास जाणवतात व ऐकण्यासही कमी येऊ लागते. दंड, बाहू आणि हाताचे पेर येथे मुंग्या येतात, वेदना येतात, अशक्तपणा येताे. वाढलेला रक्तदाब हेसुद्धा आवाज येण्याचे कारण हाेऊ शकते. अशा वेळी डायास्टाेपिक प्रेशर बरेच वाढलेले असू शकते. घणाघाती डाेकेदुखी, अस्वस्थपणा, मळमळ, उलटी, अस्पष्ट नजर, िफट येणे आणि भान हरपणे अशाही गाेष्टी घडू शकतात.कानात आवाज ऐकू येतात. सहसा एका कुशीवर झाेपल्यावर ताे आवाज अधिक स्पष्ट जाणवताे. वार्धक्यामुळे कानांची श्रवणक्षमता कमी हाेते; परंतु आवाजही निर्माण हाेऊ लागतात. याला प्रेस-बाय- ऍक्युसिस म्हणतात.