कन्या

    29-Aug-2023
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन सुखमय राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या शत्रूची चाल समजायला हवी. सासरकडून तुम्हाला धनलाभ हाेईल. ज्यामुळे तुमचे यश व कीर्ति वाढेल.काेणत्याही गाेष्टीचा जास्त विचार करू नये. स्वत:च्या बुद्धीने निर्णय घेतल्यास नक्कीच यश मिळेल.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्याची सुरुवात करिअरच्या दृष्टीने उत्तम ठरणारी असेल. स्पर्धेत तुम्हाला जय मिळेल. व्यापारी वर्गासाठी आठवड्याची सुरुवात खूपच चांगली असेल. नाेकरदारांची हव्या त्या जागी बदली हाेऊ शकते. पण, कठाेर परिश्रमाची तयारी ठेवायला हवी. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत यश मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवनात गुरूचे साह्य लाभेल. या आठवड्यात मामाकडून काही लाभ हाेण्याची श्नयता आहे. घरात चालू असलेला जुना वाद मिटेल. याबाबत तुम्ही सामाेपचाराने व शांतपणे वाद साेडवण्याचा प्रयत्न केला, तर ताे लवकर मिटेल. तुम्ही तुमच्या वडिलांची तब्बेत जपायला हवी.
 
 आराेग्य : या आठवड्यात जुन्या आराेग्यविषयक त्रासांतून तुमची सुटका हाेईल. तसा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी त्रासविरहित असणार आहे. तरीही तुम्ही तुमच्या आराेग्याची काळजी घ्यायला हवी. विशेषत: खाण्या-पिण्यावर ताबा ठेवायला हवा. तसेच, काेणत्याही गाेष्टीचा जास्त ताण घेऊ नये.
 
 शुभ दिनांक : 27, 28, 31
 
 शुभरंग : काळा, पांढरा, नारंगी
 
 शुभवार : साेमवार, बुधवार, शुक्रवार
 
 दक्षता : काेणतेही काम गडबडीत करू नये. अन्यथा ते बिघडू शकते.
 
 उपाय : श्रीगणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात, तसेच गाेशाळेत गवताची व्यवस्था करावी.