वृषभ

    29-Aug-2023
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुम्ही विनाकारण खर्च करणे टाळायला हवे. जाेडीदाराचा सहवास व मदत तुम्हाला भरपूर मिळताना दिसत आहे.
तुमच्या व्यवसायाचे नवे डील फायनल करण्यासाठी भावांशी सल्लामसलत करू शकता. नाेकरदारांना या आठवड्यात बढती मिळू शकते. ज्यामुळे ते प्रसन्न राहतील.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात करिअर क्षेत्रात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. करिअरमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तसेच जुनी समस्याही दूर हाेईल. तुमचे अधिकाऱ्यांसाेबतचे संबंध बिघडू शकतात.व्यावसायिकांना फायदा हाेईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन उत्तम असेल. तुम्ही सुखी व आनंदी राहाल. कुटुंबात तुमचा मान वाढेल.नात्यांत गाेडवा असेल. आई-वडिलांची तब्बेत चांगली राहिल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळू शकताे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमच्या मार्गातील बाधा दूर हाेतील. तब्बेतीच्या समस्या कमी हाेतील. जर पाेटाचा त्रास असेल, तर डाॅ्नटरांचा सल्ला घ्यावा व याेग, व्यायाम व ध्यानही करीत राहावे. तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. रागावर ताबा न ठेवल्यास तुमचा त्रास वाढू शकताे.
 
 शुभ दिनांक : 28, 01, 02
 
 शुभरंग : केशरी, निळा, जांभळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नये.
 
 उपाय : या आठवड्यात श्रीगणेशाची उपासना तुमच्यासाठी खूपच फलदायी राहील. गाेशाळेत गवत दान करणे लाभदायक ठरेल