हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम फलदायी राहील. तुम्हला नाेकरीत एखाद्या महिला अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. कुटुंबात तुमचा मान व प्रतिष्ठा वाढेल.या आठवड्यात जर तुम्ही एखाद्याकडून उसने पैसे मागाल, तर ते तुम्हाला सहजतेने मिळतील. तुम्ही फालतू खर्च टाळायला हवा.
नाेकरी/व्यवसाय : करिअरच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम असणार आहे.कामात तुम्ही दक्षता बाळगण्याची गरज आहे.काेणत्याही कामाबाबत घाईत निर्णय घेऊ नये. नाेकरदार जर बदलीसाठी थाेडी प्रतिक्षा करतील, तर ते त्यांच्यासाठी उत्तम ठरेल. मनाजाेग्या जागी बदली हाेऊ शकते.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या काैटुंबिक जीवनात खळबळीचे वातावरण राहील. काैटुंबिक जीवनात चालू असलेले त्रास संपुष्टात येण्यास सुरुवात हाेईल.वडिलाेपार्जित संपत्तीचा वाद असेल, तर ताे साेडवण्याचे काम करावे. सर्व प्रकरण शांतपणे साेडवाल, तर लवकर यश मिळेल.
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तब्बेतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. कुटुंबातील वादाचा तुमच्या तब्बेतीवर परिणाम हाेऊ शकताे. छाेटे-माेठे आजार तुम्हाला सतावू शकतात. तब्बेतीची काेणतीही माेठी समस्या उद्भवू नये यासाठी थाेडी दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
शुभ दिनांक : 28, 31, 02
शुभरंग : गुलाबी, पांढरा, लाल
शुभवार : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
दक्षता : या आठवड्यात तुम्ही तुमच्या क्षमतेचा याेग्य वापर करायला हवा.
उपाय : या आठवड्यात शंकराला अक्षता वाहा आणि शिवलिंगावर अभिषेक करा. मंगळवारी हनुमानचालिसा वाचा.