हा आठवडा तुमच्यासाठी उन्नतीवर्धक दिसून येत आहे. जर तुम्ही तुमचा पैसा एखाद्या शेअर बाजार वा लाॅटरीत गुंतवाल, तर त्यातून नक्कीच फायदा मिळू शकताे. प्रेमीजनांना जर एखादा अडथळा येत असेल, तर या आठवड्यात ताे दूर हाेईल. मुलांकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला करिअरबाबत उत्तम परिणाम मिळू शकतात. तुमच्या कमाईत वाढ हाेण्याची श्नयता आहे. तसेच, चांगल्या प्रमाेशनसाेबत उत्तम सॅलरी मिळेल. नव्या क्षेत्रात गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा हाेईल. कार्यक्षेत्रात हाेणाऱ्या फसवणुकीबाबत सावध राहावे.
नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवनात काही त्रास असू शकताे.जाेडीदारासाेबत मतभेद हाेण्याची श्नयता आहे. आपसातील विश्वासात काही गैरसमज निर्माण हाेण्याची श्नयता आहे. मुलांसंबंधित घरात शुभकार्य घडू शकते जे तुम्हाला आनंदी ठेवू शकते. वडिलांची तब्बेत जपावी.
आराेग्य : या आठवड्याची सुरुवात आराेग्याच्या दृष्टीने तितकीशी चांगली असणार नाही. तुम्ही मानसिक रूपात त्रस्त असाल; पण आराेग्याच्या त्रासापासून सुटाल. स्वत:ची तब्बेत उत्तम बनवण्यासाठी सकस आहार, याेग, ध्यान व व्यायामाचा दिनचर्येत समावेश करा. विचार सकारात्मक ठेवा.
शुभ दिनांक : 31, 01, 02
शुभरंग : निळा, पिवळा, हिरवा
शुभवार : मंगळवार, गुरुवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात काेणतेही नवे काम करण्यापूर्वी त्यातील बारकावे समजून घ्या.
उपाय : मंगळवारी हनुमंताचा उपवास करा. उपवास श्नय नसल्यास किमान हनुमंताची पूजा अवश्य करा.