हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे तुमच्या आदरसन्मानात वाढ हाेईल. तुम्ही केलेल्या कामाचे सार्थक हाेईल. प्रेमीजनांमध्ये नवी ऊर्जा संचारेल. विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने यशस्वी हाेऊ शकतील.
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगला राहण्याची अपेक्षा आहे. तुमच्या कामाचा पुरेपूर माेबदला मिळेल. तुम्ही तुमच्या कार्यस्थळातून फायदा मिळवू शकता. जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर व्यवसायातून भरपूर नफा मिळवू शकता. करिअरमध्ये एखादे माेठे यश मिळेल.
नातीगाेती : काैटुंबिकदृष्ट्या हा आठवडा काहीसा प्रतिकूल असेल. कारण आठवड्याच्या आरंभीच तुम्हाला काैटुंबिक ताण असू शकताे. अनावश्यक खर्चांमुळे तुम्ही त्रस्त राहू शकता. तसेच, तुम्हाला मुलांचीही चिंता असू शकते. एकूणच काैटुंबिक जीवन या आठवड्यात संमिश्र स्वरूपाचे असेल.
आराेग्य : या आठवड्याची सुरुवात आराेग्याच्या दृष्टीने उत्तम राहणार आहे.जर दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असाल, तर डाॅ्नटरांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही सध्या तेलकट पदार्थ खाणे टाळायला हवे. तसेच, प्रवास करताना तब्बेतीकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे रागावर ताबाही ठेवायला हवा.
शुभ दिनांक : 27, 29,02
शुभरंग : केशरी, जांभळा, भुरा
शुभवार : साेमवार, गुरूवार, शनिवार
दक्षता : काेणतेही काम घाईगडबडीत करू नये; अन्यथा काम बिघडू शकते.
उपाय : शुक्रवारी लहान मुलींना पांढरी मिठाई, तांदळाची खीर वा बत्तासे प्रसादरूपात वाटावेत.