वृत्तपत्रांमधून पत्रलेखन करणाऱ्यांना पत्रवाटप

26 Aug 2023 17:51:37
 
patra
 
पुणे, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
वृत्तपत्र पत्रलेखन दिवसानिमित्त वृत्तपत्र पत्रलेखन करणाऱ्या नागरिकांना मोफत पत्रांचे वाटप करण्यात आले. समाजातील अनेक सजग नागरिक विविध वृत्तपत्रांमधून वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, प्रशासकीय प्रश्नावर पत्रलेखन करतात. त्यातून अनेक विषयांना वाचा फोडतात. त्यांचा गौरव करण्यात आला. चुकीच्या प्रकारांना लगाम घालण्यासाठी आपले परखड मत व्यक्त करतात. अशा वृत्तपत्रांमधून लिखाण करणाऱ्या नागरिकांचे कौतुक आणि जास्तीतजास्त लोकांना वृत्तपत्रांमधून लिखाण करण्यासाठी प्रेरणा मिळावी, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस अश्विन शिंदे यांनी ही पत्रवाटप मोहीम सुरू केली. आनंदनगर येथील टपाल कार्यालयात आलेल्या नागरिकांना मोफत पत्र देऊन आपल्याला आवडेल त्या विषयावर पत्रलेखन करून वृत्तपत्रात पाठविण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. यावेळी संगीता बारभाई, राजेंद्र इंगुळकर, संगीता गजरे, प्रसन्न कुलकर्णी, अश्विन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0