चीनचे पहिलेच पाेलर बेअर हाॅटेल ट्राेल

    17-Aug-2023
Total Views |
 
 

China 
 
चीनच्या हेलांग जियांग राज्यात हार्बिन शहरामध्ये पाेलर लँड थीम पार्कमध्ये पाेलर बेअर हाॅटेल सुरू हाेताच हाॅटेलविरुद्ध चाैफेर टीका हाेत आहे. या हाॅटेलमध्ये 21 खाेल्या असून, प्रत्येक खाेलीमधून धु्रवीय अस्वल दिसते. या अस्वलासाठी खास खाेली आहे. त्यात बर्फाऐवजी पांढरा रंग दिला आहे. या हाॅटेलमध्ये जनावरांवर अत्याचार हाेत असल्याचा आराेप केला गेला आहे. चीनमध्ये प्राणी पाळणे हा गुन्हा नाही. या हाॅटेलचे एका दिवसाचे भाडे 28 हजार ते 35 हजार रुपये आहे. हे भाडे इतर हाॅटेलांपेक्षा दुप्पट आहे.