मुक्ता टिळक यांच्या जयंतीनिमित्त कर्करुग्णांवर मोफत उपचार, तपासणी शिबिर

12 Aug 2023 16:53:08
 
mukta
 
पुणे, 11 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने 17 आणि 18 ऑगस्ट रोजी मोफत कर्करोग तपासणी, मार्गदर्शन आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आमदार मुक्ता टिळक यांनी पाच वर्षे कर्करोगाशी धैर्याने लढा दिला. मात्र, मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. टिळक यांच्या स्मरणार्थ मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. कर्करोगपीडित रुग्णांची सेवा हा या फाउंडेशनचा प्रमुख उद्देश आहे. त्याला अनुसरूनच फाउंडेशनच्या वतीने 17 ऑगस्टला मुक्ता टिळक यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त कर्करोगपीडित रुग्णांसाठी मोफत तपासणी, मार्गदर्शन आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नारायण पेठेतील टिळक वाड्यातील लोकमान्य सभागृहामध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेत हे शिबिर होणार असून, तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. कर्करोगावर उपचार सुरू असणारे; तसेच या शिबिरात निदान होणाऱ्या पहिल्या 100 रुग्णांवर केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडियशनचा खर्च फाउंडेशन करणार आहे. मोफत उपचाराचा लाभ घेण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0