छाेट्या शिशूंना अंगठा अथवा बाेटे चाेखण्याच्या सवयीचे मुख्य कारण आहे, त्यास बाटलीने पूर्ण दूध चाेखण्यास मिळत नाही. ज्याच्या कारणाने ते अंगठा चाेखून या कमतरतेची पूर्तता करतात. अशात ध्यान द्यावे की मुलाला किती वेळा दूध पाजावे आणि किती वेळ दूध पाजावे? जेव्हा मूल पहिल्यांदा अंगठा चाेखू लागते तेव्हाच या गाेष्टीचे ध्यान राखावे.अन्यथा ही त्याची सवय बनते.सर्व शिशूंची अंगठा चाेखण्याची वेळ सारखी नसते. काही शिशू असे असतात की गर्भाशयातूनच अंगठा चाेखत येतात. काही कुटुंबातील अंगठा चाेखण्याची जन्मजात प्रवृत्ती याचे कारण असते. तर दात निघत असलेल्या दिवसांतही शिशू अंगठा, तसेच बाेटे चाेखू लागतात.स्तनपान करणाऱ्या शिशूंमध्ये ही प्रवृत्ती प्राय: फार कमी आढळते. म्हणूनच अंगठा चाेखणाऱ्या शिशूंना अधिक वेळापर्यंत स्तनपान करावे. अशात मुलाला 40 मिनिटांपर्यंतही स्तनपान करविले जाऊ शकते. माता आपल्या सुविधेनुसार आपल्या दाेन्ही स्तनांनी वीस-वीस मिनिटांपर्यंत स्तनपान करू शकतात.