दर्जेदार शिक्षण, पाैष्टिक आहारामुळे शिक्षित, सुदृढ पिढी घडेल : नार्वेकर

    06-Jul-2023
Total Views |
 
 
 
 
 
school
 
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि पाैष्टिक आहार उपलब्ध करून देण्यात शासनासमवेत खासगी संस्थांनीही सहकार्य करावे. यामुळे शिक्षित समाज, सुदृढ युवा पिढी घडण्यास मदत हाेणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी व्य्नत केले.अ‍ॅड. नार्वेकर यांच्या पुढाकाराने आणि हरे कृष्ण मूव्हमेंट फाऊंडेशन, अवेक अँड अराईझ या संस्थांच्या साह्याने अक्षय चैतन्य याेजनेच्या माध्यमातून कुलाबा क्षेत्रातील महापालिका शाळांतील नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना माेफत माध्यान्ह भाेजन उपक्रमाचा प्रारंभ कुलाबा महापालिका माध्यमिक शाळेत अ‍ॅड. नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी ते बाेलत हाेते.हरे कृष्ण मूव्हमेंट फाऊंडेशन आणि अवेक अँड अराईड अशा खासगी संस्थांच्या मदतीने कुलाबा क्षेत्रासह मुंबईतील 7500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पाैष्टिक भाेजन देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या याेजनेचा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ मिळणार असल्याचे अ‍ॅड. नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अ‍ॅड. नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.