भुतांचे, कर्णाचे आणि शकुनीचे मंदिर

    15-Jul-2023
Total Views |
 
 

Temple 
 
भुतांचे मंदिर आपल्या संस्कृतीत देवाची पूजा केली जाते. जेवढे देव आहेत त्यांची प्रत्येक ठिकाणी कितीतरी मंदिरे आहेत.आश्चर्याची गाेष्ट म्हणजे आपल्या भारतात भुताचे मंदिर बांधून त्याची पूजा करणारे एक ठिकाण आहे.कर्नाटकात दक्षिण कन्नड जिल्ह्यात भुतांची मंदिरे आहेत. यात स्त्री पुरुष तसेच प्राणीरुप भुतांची पूजा अर्चा, उत्सव धडा्नयाने साजरे केले जातात. या देवालयांना भुतांचे स्थान असेही म्हणतात. या देवळात भुतांच्या लाकडी किंवा धातूंच्या प्रतिमा, मुखवटे किंवा धातूंच्या विविध वस्तू भुतांची प्रतीके म्हणून ठेवली जातात.कर्णाचे मंदिर महाभारतातील ज्येष्ठ कुंतीपुत्र कर्णाची पूजा काेणी करत नाहीत. परंतु उत्तर काशीच्या सारनाैल गावात कर्णाचे मंदिर आहे. हे मंदिर लाकडाचे आहे. या मंदिरावर पक्षी, प्राणी काेरलेले आहेत. रामाणातील काही प्रसंगांची चित्रणेही या मंदिरावर आहे.या मंदिरासमाेरील जागेत पांडवाची मंदिरेही आहेत.
 
तसेच इथल्या एका मंदिरात पार्वती, शिवलिंग व नंदी आहे.काेणाची मनाेकामना पूर्ण झाली तर मंदिरावर खिळ्यांनी नाणे ठाेकण्याची परंपरा आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी इथे चेंडूचा उत्सव साजरा केला जाताे.शकुनी मंदिर महाभारतातला खलनायक, गांधारीचा भाऊ, दुर्याे धनाचा मामा असलेला शकुनी. या शकुनीमामाचे मंदिरही भारतातल्या लाेकांनी बांधले व त्याची पूजाही केली जाते.केरळच्या काेल्लाममध्ये पवित्रेश्वर इथे हे मंदिर आहे.शकुनीला तिथे द्वापार युगाचा अवतार मानतात. त्याच्या देवळाची सर्व व्यवस्था कुरावर समाजाकडून केली जाते. या मंदिरात मल्लकलाडा महाेत्सव साजरा केला जाताे. त्याच्या पूजेत नारळ, रेशमी वस्त्र व ताडी यांचा समावेश हाेताे.