बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी अर्थात एमबीबीएस ही पदवी परदेशातील विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत प्रवेश घेऊन संपादन करण्याचा लाेकप्रिय पर्याय गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. मात्र परदेशात शिक्षण घेण्याच्या निर्णयाचे अन्य अभ्यासक्रमांबाबत देखील जसे फायदे-ताेटे असतात तेच मुद्दे परदेशात एमबीबीएस पदवी संपादन करण्यालाही लागू हाेतात.
फायदे: 1) शुल्क कमी: परदेशातील विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी भारताच्या तुलनेत कमी शुल्क आकारले जाते.भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक शुल्क अवाच्या सवा आकारण्यात येते. दरवर्षी लाखाे रुपये शैक्षणिक शुल्क म्हणून भरणे प्रत्येक पालकांना श्नय नसते.त्यामुळेच अनेक विद्यार्थी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचा मार्ग निवडतात. जेणेकरून शैक्षणिक शुल्कासाठी खर्च हाेणाऱ्या पैशांची बचत व्हावी.
2) गुणवत्तापूर्ण शिक्षण: अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये जागतिक दर्जाचे वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते.परदेशातील बहुतेक विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठीच्या अतिशय अत्याधुनिक सुविधा असतात. त्याचबराेबर अनुभवी असे शिक्षक-प्राध्यापक उपलब्ध असतात. अर्थात परदेशातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांना ही बाब लागू पडत नाही. त्यामुळे चांगल्या वैद्यकीय शिक्षणासाठी वद्यार्थ्यांनी महाविद्यालय, विद्यापीठाची निवड करताना काळजी घेणे आवश्यक असते.
3) बहुविध संस्कृतीशी आदानप्रदान: परदेशात शिक्षण घेण्यामुळे विद्यार्थ्यांना जगभरातील विविध संस्कृतींची ओळख हाेते आणि अशा विविध संस्कृतींमधील विद्यार्थ्यांशी विचारांची आणि संस्कृतीची देवाण-घेवाण करणे श्नय हाेते.विद्यार्थ्यांचा दृष्टिकाेन व्यापक हाेताे. जगातील नवनवीन क्षितिजे त्यांना खुणावू लागतात. जगभरातील विविध संस्कृतींमधील परंपरा, मूल्ये, श्रद्धा यांचा परिचय हाेण्यास मदत हाेते.
4) करिअरच्या अधिक चांगल्या संधी: परदेशातील विद्यापीठांत शिकताना विद्यार्थ्यांसाठी तेथील अत्याधुनिक सुविधा व साधनसामग्री वापरण्यासाठी उपलब्ध हाेते.त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरची शिडी सहजपणे चढत जाणे श्नय हाेते. परदेशी विद्यापीठांमध्ये संशाेधनाच्या तुलनेत चांगल्या संधी उपलब्ध असतात. त्यामुळे त्या ठिकाणी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणे करिअरला आकार देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
ताेटे :
1) भाषेचा अडसर:अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षण दिले जाते. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांसाठी ही बाब अडचणीची ठरते. मुख्य म्हणजे इंग्रजीखेरीज वेगळ्या भाषांतून वैद्यकीय शिक्षण घेणे भारतीय विद्यार्थ्यांसाठी अतिशय आव्हानात्मक असते. कारण त्यांना त्या भाषेची ओळख नसते. अशा स्थितीत शिक्षणाच्या गुणवत्तेवर तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर प्रतिकूल परिणाम हाेण्याची श्नयता असते.
2) वैद्यकीय परवाना आणि मान्यता: परदेशी विद्यापीठांतून वैद्यकीय पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आल्यावर डाॅ्नटर म्हणून प्रॅ्निटस करण्यापूर्वी फाॅरेन मेडिकल ग्रॅज्युएट ए्नझाम म्हणजेच एफएमजीई ही परीक्षा द्यावी लागते. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी एफएमजीईची परीक्षा अतिशय आव्हानात्मक ठरते. त्यामुळेच परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले सर्वच विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण हाेतातच असे नाही.
3) सांस्कृतिक धक्का: परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी तेथील संस्कृती, राहणीमान, वेशभूषा या सगळ्या गाेष्टी कल्पनेपलीकडच्या असतात. या परदेशी जीवनशैली, प्रथा, मूल्ये यांच्याशी जुळवून घेणे त्यांना अनेकदा अवघड जाते. त्यातून मग घराची आठवण येणे, एकाकीपणा वाटणे, मानसिक समस्यांना ताेंड द्यावे लागते.
4) उच्चकाेटीची स्पर्धा: परदेशी विद्यापीठांतही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असते आणि अतिशय कडक निकषांमधून विद्यार्थ्यांची वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येते. त्यामुळे परदेशात प्रवेश मिळण्यासाठी अनेकदा विद्यार्थ्यांकडे विशेष काैशल्य क्षमता आणि गुणवत्ता असणे आवश्यक ठरते. जेणेकरून विद्यार्थ्यांना अपेक्षित विद्यापीठांत किंवा महाविद्यालयांत प्रवेश मिळणे श्नय व्हावे.