पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय रँकिंगमध्ये घसरण

    07-Jun-2023
Total Views |
 
sppu
 
पुणे, 6 जून (आज का आनंद न्यूज नेटवर्क)
 
देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या रँकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली असून, ही रँक 35 असून विद्यापीठांच्या गटात 19व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गेल्या वर्षी विद्यापीठ ओव्हरऑल गटात 25व्या स्थानावर होते; तर वर्ष 2020 मध्ये विद्यापीठ गटात पहिल्या 10 मध्ये 9व्या क्रमांकावर होती. असे असले तरी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ आजही प्रथम क्रमांकावर आहे. नॅशनल इस्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ-2023) विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी 58.31 गुण मिळाले आहेत; तर ओव्हरऑल गटात 55.78 गुण आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी वर्ष 2023 रँकिंग जाहीर केले. देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मंत्रालयाकडून हे रँकिंग दिले जाते. देशात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासने ओव्हरऑल रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
 
गेल्या तीन वर्षांपासून पुणे विद्यापीठाच्या क्रमवारीत दरवर्षी घसरण होत आहे. विद्यापीठ गटात 2020 मध्ये 9 क्रमांकावर असलेले विद्यापीठ मागील वर्षी 12 व्या क्रमांकावर होते; तर 2021 मध्ये 11 वे स्थान मिळाले होते. त्या वेळी एकूण 58.34 एवढे गुण होते. सर्व शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ देशात 35व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी हा क्रमांक 25वा होता. विज्ञापीठाची क्रमवारी ठरविताना देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, इंजिनीअरिंग, महाविद्यालये, मॅनेजमेंट, फार्मासी, मेडिकल, डेंटल, लॉ, अर्किटेक्चर आणि कृषी असे एकूण 12 गट केले आहेत. हा दर्जा ठरविण्यासाठी संशोधन, सर्वसमावेशकता, पदवीधर विद्यार्थ्यांचे निकाल, संख्या आणि शिकविणे, शिकणे आणि संसाधने असे काही निकष ठरविले आहेत.