डॉ. अरविंद संगमनेरकर यांचे निधन

    06-Jun-2023
Total Views |
 
pear
 
पुणे, 5 जून (आ.प्र.) :
 
पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ तसेच नवी पेठेतील कॉलनी नर्सिंग होमचे संस्थापक आणि शतायुषी या प्रसिद्ध आरोग्यविषयक दिवाळी अंकाचे संस्थापक डॉ. अरविंद वासुदेव संगमनेरकर यांचे रविवारी पहाटे (दि. 4 जून) त्यांच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.