साेशल मीडियात कंटेंटसाठी केला जाताे जुगाड

    06-Jun-2023
Total Views |
 
 


Social media
 
 
 
सध्याच्या काळात साेशल मीडियाशिवाय राहणे लाेकांना श्नय नाही. माहितीपासून करमणुकीपर्यंत सर्व काही कंटेंट त्यावर असल्याने वेळ कसा घालवावा हा प्रश्नच बाद झाला आहे.कंटेंटसाठी काेणत्याही विषयाचे बंधन नाही. अंडे हा कंटेंटचा विषय हाेऊ शकत नाही, असे तुम्हाला वाटत असेल, तर ती समजूत बदलावी लागेल.उलट अंडे हाच लाेकप्रिय कंटेंट असल्याचे दिसले आहे. या अंड्याने सर्वाधिक लाइ्नस मिळविण्याचा विक्रम माेडला आहे.2019 मध्ये इन्स्टाग्राम अकाउंटवर एका अंड्याचा फाेटाे पाेस्ट केला गेला हाेता. अन्य काेणत्याही ऑनलाइन इमेजपेक्षा सर्वाधिक लाइ्नस मिळविणारा फाेटाे म्हणून या अंड्याची प्रसिद्धी करा, असे आवाहन साेबत हाेते आणि केवळ दहा दिवसांत विक्रम झाला. डिजिटल जगात काेणाला कशी प्रसिद्धी मिळू शकते याचे हे एक उदाहरण.ती मिळविण्यासाठी जगभरातील लाेक सतत काही ना काही जुगाड करण्यात गुंतलेले असतात.
 
साेशल मीडियाच्या तळापाशी : साेशल मीडियाच्या जगात कंटेंटची कमतरता नाही. हे जग केवळ इन्स्टाग्राम, फेसबुक अथवा यूट्यूबपुरते मर्यादित नसून, एकाच छताखाली विविध डिजिटल प्लॅटफाॅर्म्स त्यात आहेत.या प्लॅटफाॅर्म्सवरून वेगवेगळे कंटेंट सादर केले जातात. उदा. व्हिडिओ हाेस्टिंग साइट्स, ब्लाॅग, साेशल रिव्ह्यू साइट्स, व्हिडिओ/इमेज शेअरिंग साइट्स आणि पाॅडकास्ट आदी. त्यावर जगभरातून कंटेंट टाकला जाताे. या सगळ्या प्लॅटफाॅर्म्सवर एक ते 25 काेटी सबस्क्रायबर्स असलेले टाॅप कंटेंट क्रिएटर्स आहेत. नंतर येतात एक लाखांपर्यंत सबस्क्रायबर्स असलेले कंटेंट क्रिएटर. या गटात दरवर्षी 40 ते 45 टक्के वाढ हाेते आहे.
 
कंटेंट आहे तर पैसा आहे : पुढे जाण्यासाठी डिजिटल जगाने तयार केलेले आणि वाढविले जाणारे काेणतेही डिजिटल मटेरियल म्हणजे कंटेट. ते तयार करणारे आणि पाहणारेही खूप आहेत. ‘स्टॅटिस्टा’च्या माहितीनुसार, भारतीय लाेक दरराेज सुमारे 2 तास 36 मिनिटे साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म्सवर घालवितात आणि ‘रेडसीर’च्या म्हणण्याप्रमाणे, यातील बहुसंख्य लाेक टियर-2 शहरांतील आहेत. साेशल मीडियाच्या वापरात आणि कंटेंट तयार करून त्यावर टाकण्यात सुमारे 10 काेटी कंटेंट क्रिएटर्स असल्याचे आकडेवारी सांगते. जगभरातच डिजिटल कंटेंटची बाजारपेठ वेगाने वाढते आहे. भारतातील डिजिटल कंटेंटच्या बाजारपेठेचा विचार केला, तर सध्या ती सुमारे 150 दशलक्ष डाॅलरची असून, तज्ज्ञांच्या मते 2028पर्यंत ती 24.73 अब्ज डाॅलरपर्यंत पाेहाेचेल.
 
येथेही ‘फाेटाें’ना पसंती : डिजिटल प्लॅटफाॅर्म्सवर मनाेरंजनापासून फॅशनपर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून शिक्षणापर्यंतचे विविध कंटेंट आहेत. मात्र, व्हिज्युअल कंटेंटला यूजर्सची प्रथम पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे.ग्राफ्निससह असलेला कंटेंट अन्य सामान्य कंटेंटच्या तुलनेत 40पट जास्त पाहिला जात असलेल्या विविध पाहण्यांमधून सामाेरे आले आहे. असे कंटेंट शेअरही जास्त केले जातात. कंटेंटमध्ये एखादा चेहरा असेल, तर ताे सुमारे 38 टक्के जास्त पसंत केला जात असल्याचेही दिसले आहे. स्क्रीनवरील उपस्थिती आणि अभिनयकाैशल्य दाखविणाऱ्या कंटेंटबराेबरच अनेक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्ससुद्धा आहेत. यांची फाॅलाेअर्सची संख्या जास्त असल्याने ते नफाही मिळवितात. स्मार्टफाेन आणिइंटरनेटमुळे शहरेगावांतील अंतर दूर झाले असून, लाेक काेठूनही कंटेंट तयार करून टाकत आहेत.
 
वयाचे बंधन नाही : वयाचे बंधन साेशल मीडियावर नाही. 96 वर्षांच्या हरभजन काैर यांनी त्यांच्या बेसन बर्फीच्या प्रसिद्धीसाठी साेशल मीडियाचा वापर केला आणि त्याचा अनुकूल परिणाम हाेत त्यांचा व्यवसाय वेगाने वाढताे आहे. तीन वर्षांच्या कुकू या चिमुकलीचे उदाहरण पाहा. आई करत असलेले प्रयाेग पाहून कुकूने तिचा ‘कुकूकन्हाई’ हा इन्स्टा चॅनेल सुरू केला असून, 89.6 हजार लाेक तिला फाॅलाे करतात. म्हणजे, येथे कंटेंट क्रिएटर आणि यूजर यांना वयाचे बंधन नाही.काेणत्याही वयाची व्यक्ती तिचा कंटेंट टाकू शकते आणि ताे आवडला, तर सगळ्या वयांचे लाेक तिला फाॅलाे करायला लागतात. याच कारणांमुळे लहान वयाच्या मुलांपासून 85-90 वर्षांपर्यंतचे लाेक साेशल मीडियावर कंटेंट टाकायला लागले आहेत आणि त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्याही लक्षणीय आहे. इन्फ्ल्युएर्सची बाजारपेठ वेगाने वाढते आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत कंटेंट क्रिएटर्सचे महत्त्वाचे याेगदान आहे.
 
इन्टाग्राम इन्फ्ल्युएसर निहारिका जैन म्हणाल्या, की प्रारंभीच्या काळात फावल्या वेळेतील उद्याेग म्हणून लाेक कंटेंट तयार करत असत.त्यावेळी ही बाजारपेठ नव्हती आणि या क्षेत्राची फार काेणाला माहितीसुद्धा नव्हती. पण, आता का बदलला असून, यातून लाेक पैसा मिळवित आहेत. मी स्वत: 2019 मध्ये नाेकरी साेडून इन्स्टाग्रामवर कंटेंट टाकायला सुरुवात केली आणि ताे लाेकप्रिय झाला. निहारिका जैन यांच्याप्रमाणेच ‘दिल से फुडी’ या नावाने ब्लाॅग चालविणारे करण दुआ, ‘बीबी की वाइन्स’चे भुवन बाम, ‘मासूम मीनावाला’ म्हणजे राजस्थानी गायक मामे खान यांच्यासारख्यांनी कंटेंट क्रिएशनवर नाव कमाविले आहे.ऑ्नसफाेर्ड इकाॅनाॅमिस्ट’च्या एका अहवालानुसार, 2020 मध्ये फक्त यूट्यूबर्सच्या कमाईतून अर्थव्यवस्थेला 6,800 काेटी रुपयांचे याेगदान लाभले हाेते आणि प्रत्येक वर्षी ते वाढत चालले आहे.