नासाच्या अवकाश यानाकडून दाेन ग्रहांचा शाेध

    06-Jun-2023
Total Views |
 
 


NASA
 
 
अमेरिकेची अंतराळ संशाेधन संस्था, नासाच्या टेस अवकाशयानाने दाेन ग्रह शाेधले आहेत, जिथे जीवनाची श्नयता आहे, भविष्यात तिथे मानव राहू शकताे. हे दाेन्ही ग्रह ताऱ्यापासून इत्नया सुयाेग्य अंतरावर आहेत की, त्यांच्यावर जीवनाची निर्मिती हाेऊ शकेल. पृथ्वीपेक्षा माेठ्या आणि वजनाने जास्त असल्याने त्यांना सुपर अर्थ नाव दिले गेले आहे.नासाच्या म्हणण्यानुसार, ट्रान्झिटिंग ए्नसाेप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (टेस) अवकाश यानाने टीओआय-2095 बी आणि टीओआय-2095 सीचा शाेध घेतला आहे.सर्वात आधी टेसने साैर मंडलापासून 137 प्रकाश वर्षे दूर सूर्यासारखे तारे टीओआय- 2095च्या प्रतिमा मिळविल्या आहेत. त्यात आढळले की, टीओआय-2095 ब्रह्मांडातील सर्वात माेठ्या ताऱ्यांच्या कुटुंबाशी जाेडलेलआहे. ताे आपल्या सूर्यापेक्षा थंड आहे. पण खूप जास्त रेडिएशन, अल्ट्राव्हायाेलेट आणि ए्नस-तरंग बाहेर साेडत आहे.
 
त्याची परिक्रमा करताना हे दाेन्ही ग्रह आढळले आहेत. म्हणून इथे जीवसृष्टी असू शकते, असा अंदाज आहे.स्पेनची युनिव्हर्सिटी ऑफ ला लगुनाचे खगाेलशास्त्रज्ञ फेलिप मुर्गास म्हणतात की, या दाेन्ही ग्रहांचा आम्ही जास्त अभ्यास करत आहाेत. त्यांच्याविषयी सुरुवातीच्या तपासातून समजले आहे की, तिथे जीवन श्नय आहे.त्यांनी म्हटले की, आमचे टेस अवकाश यान खूप श्नितशाली आहे. ते खूप अचूक माहिती पाठवित आहे. टीओआय-2095 बी ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा 1.39 पट माेठा आणि 4.1 पट जास्त वजनाचा आहे. हा ग्रह आपल्या ताऱ्याभाेवतीची प्रदक्षिणा 17.7 दिवसांमध्ये पूर्ण करताे. टीओआय-2095 सी आपल्या ताऱ्याभाेवतीची प्रदक्षिणा 28.2 दिवसांमध्ये पूर्ण करताे. ताे आपल्या पृथ्वीपेक्षा 1.33 पट माेठा आहे.आणि वजनाला 7.5 पट जास्त आहे. दाेन्ही ग्रहांच्या पृष्ठभागाचे तापमान 24 ते 74 डिग्री सेल्सियसच्या दरम्यान आहे.
 
पृथ्वीसारखे वायुमंडल मिळाले : खगाेलशास्त्रज्ञांनी सांगितले की, टीओआय- 2095 पासून निघणाऱ्या रेडिएशनमुळे जवळ असलेल्या ग्रहांचे वायुमंडल समाप्त हाेऊ शकते. पण हे दाेन्ही ग्रह त्यापासून इत्नया अंतरावर आहेत की, तिथे पृथ्वीसारखे वायुमंडल अस्तित्वात असू शकते.नासाच्या सांगण्यानुसार, टीओआय- 2095बीचे ताऱ्यापासूनचे अंतर पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या दहाव्या भागाच्या बराेबर आहे. टीओआय- 2095 सी चे अंतर पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतरापेक्षा जास्त आहे.330 नवीन जगांचा घेतला शाेध : एप्रिल 2018मध्ये टेस लाॅंच केले गेले हाेते. त्याने आतापर्यंत 330 नवीन जगांची पुष्टी केली आहे, तर, 6400 बाहेरचे ग्रह अजूनही या यादीत सामील हाेण्याची वाट पाहत आहेत. आता शास्त्रज्ञ या ग्रहांच्या फिरण्याच्या गतीचा शाेध घेत आहेत.त्याबराेबरच त्यांच्या वायुमंडलाची तपासणीही केली जात आह