औषधांचा अतिवापर करणे प्राणघातक ठरू शकते

06 Jun 2023 14:19:26
 
 
 


Medicine
 
अमेरिकेतील राेगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी)च्या नवीन रिपाेर्टमध्ये करण्यात आलेला खुलासा ध्नकादायक आहे. अमेरिकेत औषधांच्या अतिवापराने (ओव्हरडाेस) मृत्यूचा धाेका वाढला आहे. त्यामुळे हाेणारे मृत्यू काेविड-19 महामारीच्या मृत्यूंच्या पातळीवर पाेहाेचले आहेत.सीडीएसच्या रिपाेर्टमध्ये म्हटले आहे की, औषधांच्या ओव्हरडाेसमुळे सन 2021मध्ये अमेरिकेतील सुमारे 70 हजार लाेकांचा मृत्यू झाला हाेता.त्यामध्ये फेनटाइनल मुख्य रूपाने सामील हाेता. हे इस्थेटिक ओपिओइड (वेदनाशामक) आहे. पाच वर्षांमध्ये त्यामुळे हाेणारे मृत्यू चार पटीने वाढलआहेत. सन 2021 पर्यंत औषधांच्या ओव्हरडाेसमुळे हाेणाऱ्या मृत्यूंपैकी दाेन-तृतीयांश मृत्यूंसाठी हे कारण आहे.सीडीसीच्या रिपाेर्टनुसार सन 2021मध्ये दर एक लाख लाेकांमध्ये सुमारे 22 लाेकांच्या मृत्यूमागे फेनटनाइल जबाबदार हाेते.
 
हकाेकेनच्या ओव्हरडाेसमुळे हाेणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणापेक्षा दुप्पट आणि हेराॅइनच्या ओव्हरडाेसमुळे हाेणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा सात पट जास्त आहे. फेनटनाइल हे एक सिंथेटिक ओपिओइड आहे. कॅन्सरच्या राेग्यांना गंभीर वेदनांपासून आराम देण्यासाठी याचा वापर केला जाताे.रिपाेर्टनुसार सन 2016 ते सन 2021मध्ये पाच वर्षांत औषधांच्या ओव्हरडाेसमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हेराॅइन आणि ऑ्निसकाेडाेनच्या ओव्हरडाेसमुळे हाेणारे मृत्यू कमी झाले आहेत.फेनटाइनल माॅर्फीच्या तुलनेत 100 पट जास्त श्नितशाली आहे.सर्वसाधारणपणे त्वचेवर पॅचच्या रूपातही ते वापरले जाते.पण सीडीसीच्या नुसार अमेरिकेत फेनटाइनलशी संबंधित नुकसान; ओव्हरडाेस आणि मृत्यूची नुकतीच झालेली प्रकरणे ही अवैधरूपाने बनविल्या गेलेल्या फेनटाइनलशी संबंधित हाेती.
Powered By Sangraha 9.0