संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कामांचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाेकार्पण

    06-Jun-2023
Total Views |
 
 
 

Gadgebaba 
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभागाच्या इमारत विकासकामांचे लाेकार्पण झाले. खासदार डाॅ. अनिल बाेंडे, आमदार प्रवीण पाेटे पाटील, आमदार किरण सरनाईक, प्र-कुलगुरू प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव तुषार देशमुख यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी आदी या वेळी उपस्थित हाेते. प्रारंभी पाटील यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा संदेशशिल्पास भेट देऊन अभिवादन केले.त्यानंतर राष्ट्रीय उच्चतर अभियानांतर्गत आदिवासी विकास केंद्रासाठी मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. सूक्ष्मजीवशास्त्र, भूगर्भशास्त्र विभागाच्या विविध स्थापत्य कामांचे भूमिपूजन व लाेकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले; तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी त्यांनी केली.