खडकाळ जमीन, अत्यंत कमी पाण्यातही घेता येणारी 62 पिके

    06-Jun-2023
Total Views |
 
 Crops
 
 
महाराष्ट्रातील विदर्भ- मराठवाडा या भागासहित देशातील नेहमीच काेरडा दुष्काळ पडणाऱ्या भागात काेरडवाहू, पडीक आणि खडकाळ जमिनीतसुद्धा कमीत कमी पाणी लागणाऱ्या व खडकाळ जमिनीतही उगवणाऱ्या व टिकून राहणाऱ्या 62 नवी पिके पुणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डाॅ. मंदार दातार, स्मृति विजयन, अबाेली कुलकर्णी, भूषण शिगवण आणि जर्मन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डाॅ. स्टिफन पाेरेम्बस्की यांनी शाेधली आहेत.नैसर्गिक विविधता असलेल्या पश्चिम घाटात शास्त्रज्ञांनी ही पिके शाेधली असून, या वनस्पतींना डेसिकेशन टाॅलरंट (डीटी) व्हस््नयुलर प्लांट हे नाव दिले असून, अशा वनस्पती पिकांची संख्या 62 आहे. या वनस्पतींचे वैशिष्ट्य असे की त्या खूपच कमी पाणी दिले, तरी टवटवीत राहतात. जाेमाने वाढतात.
 
पश्चिम घाट महाराष्ट्राच्या नंदुरबार येथून सुरू हाेऊन गुजरातमधील सापुतारा, गाेवा, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारीपर्यंत पसरलेला 1600 किलाेमीटर पट्टा आहे. या पट्ट्यात या वनस्पती आढळून आल्या आहेत. 95% कमी पाऊस पडणाऱ्या भागासाठी ही पिके अतिशय उपयु्नत आहेत.या पिकांना आठ दिवस पाणी दिले नाही व 9 व्या दिवशी पाणी मिळाले तरी ही पिके टवटवीत हाेतात. या 62 पिकांच्या जातींपैकी 16 प्रजाती भारतीय पारंपरिक आहेत, तर 12 प्रजाती बहुविशिष्ट आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली असेल, पाऊस कमी असेल, अशा काेरडवाहू जमिनीतही ही पिके जाेम धरतात. आता काही शेतात या पिकांची लागवड करण्यात आली आहे.