प्राचीन काळामधील अत्तरे बनवण्याची कला

    06-Jun-2023
Total Views |
 
 

Art 
 
पाश्चात्त्य देशांत सुवासिक द्रव्यनिर्मितीसाठीच्या तंत्रविद्येत प्रगती झाली आणि त्या स्पर्धेत भारतीय उद्याेग मागे पडला. तथापि, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात या उद्याेगाचे पुनरुज्जीवन हाेण्यास सुरुवात झाली.आल्हाददायक सुगंध असणाऱ्या द्रव्याला सुवासिक द्रव्य म्हणतात. सुवासिक द्रव्ये नैसर्गिक, संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेली) वा संमिश्र प्रकारची असतात. नैसर्गिक व कृत्रिम सुगंधी द्रव्यांचे याेग्य प्रमाणात मिश्रण करून सुवासिक द्रव्ये तयार करतात. मुख्यतः अपेक्षित उपयाेगानुसार सुवासिक द्रव्याचे संघटन निश्चित केले जाते. व्यक्तीची जीवनशैली, मनः स्थिती आणि कृती यांना उचित अशी हजाराे सुवासिक द्रव्ये तयार करतात.
 
यामुळे सुवासिक द्रव्यनिर्मिती ही एक कला बनली आहे.प्राचीन इजिप्शियन लाेक आपल्या प्रत्येक देवतेचा विशिष्ट सुवासिक द्रव्याशी संबंध दर्शवीत.सुवासिक द्रव्यासाठी त्यांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ देवाचा सुगंध असा हाेता. सुवासिक द्रव्यासाठी असलेला ‘परफ्यूम’ हा इंग्रजी शब्द धुरामार्फत या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून आला आहे. पूर्वी इतरत्रही धार्मिक विधींमध्ये धूप, लाकूड इ. सुगंधी द्रव्ये जाळीत असत.त्याद्वारे आत्मे स्वर्गाकडे नेले जातात, असा समज हाेता.