लाेकांना जाेडत राहावे, आपल्या स्वभावाचा ताे भाग झाला पाहिजे

    05-Jun-2023
Total Views |
 
 

relation 
 
जंगलातील पक्ष्यांची एक गाेष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. जंगलाच्या एका भागात एक शिकारी जाळे घेऊन गेला हाेता. त्याच्या जाळ्यात काही पक्षी अडकले. खरेतर, तेथील पक्षी हे जंगलाचे मूळ निवासी किंवा मालक. पण, त्या जाळ्यात अडकल्याने ते पूर्णपणे असहाय्य झाले हाेते.लहानपणी ऐकलेल्या या गाेष्टीत त्या पक्ष्यांना काही उंदरांनी मदत केली हाेती.म्हणजे, शिकारी येऊन त्या पक्ष्यांना पकडण्यापूर्वीच जंगलातील काही उंदरांनी ते जाळे ताेडले आणि पक्ष्यांना वाचवले.म्हणजे, त्या पक्ष्यांची त्या उंदरांशी असलेली मैत्री त्यावेळी कामी आली.या गाेष्टीमधून घेण्यासारखा बाेध हाच आहे की, पक्षी आणि उंदीर यांनी एकमेकांच्या रंगाचा, आकाराचा कधीच विचार केला नाही. ते मित्र हाेते आणि त्यानंतरही राहिलेच असतील.
 
याच अनुषंगाने आपण हे समजून घेतले पाहिजकी, आपणही लाेकांना साेबत घेतले पाहिजे, एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, सगळ्यांना एकत्र धरून ठेवणे, मिळून- मिसळून राहाणे, एकमेकांनी मिळून सगळ्या जबाबदाऱ्यांचे निर्वहन करणे, हे ते नेहमीच आवश्यक असते. आपण ज्या गावात, प्रदेशात, कुळात जन्माला आलाे आहाेत, ते विचारात न घेता आजूबाजूच्या सगळ्या लाेकांना साेबत घेतले पाहिजे.शक्य तेंव्हा आपल्या कामातही सामावून घेत राहिले पाहिजे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, काही कामे अशी असतात ज्यात फक्त आपली ताकद पुरेशी नसते,काही समस्या अशा असतात, ज्या आपण एकट्याने साेडवू शकत नाही,काही जबाबदाऱ्या असतात, ज्या एकट्याने पार पाडता येत नाहीत,असे काही विषय आहेत ज्यांचा नुसता अभ्यास पुरेसा पडत नाही, हेच ध्यान ात घेऊन, आपण लाेकांना जाेडत राहावे. ताे आपल्या स्वभावाचा भाग झाला पाहिजे.
 
 
केवळ कामासाठी लाेकांना आधार देणे हा स्वार्थीपणा आहे. म्हणूनच लाेकांमध्ये मिसळणे हा आपल्या स्वभावाचा भाग बनला पाहिजे. आपल्याशी संपर्क साधताना लाेकांना काेणत्याही प्रकारची शंका किंवा भीती वाटू नये. त्यांचा वापर स्वार्थासाठी हाेत आहे, असे त्या लाेकांना वाटू नये.याची काळजीही घेतलीच पाहिजे.कारण, जगात असे अनेक विषय असतात, जे लाेकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण हाेऊ शकत नाहीत. अशावेळी आपण एकमेकांना आधार द्यायला हवा.एकमेकांना साेबत घ्यायला हवे. अशा वेळी, एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ.. हा मार्ग अवलंबायला हवा.