सुरतच्या जुळ्या भावंडांना गुणही एकसारखेच मिळाले

05 Jun 2023 17:06:55
 
 


Surat
 
 
दहावीचा गुजरात बाेर्डाचा निकाल लागला. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सुरतमध्ये उत्तीर्ण मुलांची ट्नकेवारी सर्वाधिक आहे. सुरत जिल्ह्यातल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची ट्नकेवारी 76.45 ट्नके आहे, तर दाहाेद जिल्ह्यात सर्वांत कमी 40.75 ट्नकेनिकाल लागला आहे.गुजरातच्या दहावीच्या या निकालामध्ये सुरतच्या जुळ्या भावंडांनी मिळवलेले समान गुण हीदेखील सध्या चर्चेची गाेष्ट ठरली आहे. रुद्र आणि ऋत्व अशी या जुळ्या भावंडांची नावं आहेत.रुद्रला 600 पैकी 570 म्हणजे 95.50 ट्नके गुण मिळाले, तर ऋत्वलाही 600पैकी 570 गुणच मिळाले आहेत. सुरत शहराबाहेर असलेल्या भक्ती इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या या दाेघांनी त्यांच्या कुटुंबासह शाळेचं नाव उंचावलं आहे.
 
त्यांचं कुटुंब शहरात कापड व्यवसाय करतं. त्यांच्या निकालाने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. त्यांच्या व्य्नितमत्त्वाचा यांच्या गुणांवरही प्रभाव दिसून आला.ही दाेघंही भावंडं एकाच वर्गात शिकत हाेती. वर्षभर त्यांनी एकत्रपणे अभ्यास केला हाेता. त्यांना गुणही सारखेच मिळाले. विशेष गाेष्ट अशी की, दाेघांनीही वर्षभर त्यांच्या फाेनला हातही लावला नाही. संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. आता त्यांना काॅम्प्युटर सायन्स या विषयात करिअर करायचं आहे.एकसारखे गुण मिळवणारी ही भावंडं एकसारखीच दिसतात, एकसारखे कपडे घालतात. त्यांचा हा सारखेपणा त्यांच्या परीक्षेतल्या गुणांमध्येही प्रतिबिंबित झाला. या सारखेपणामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे; मात्र त्यामागे त्यांची मेहनत कारणीभूत आहे.
Powered By Sangraha 9.0