प्रेमातील फसवणुकीचा त्रास महिलांपेक्षा पुरुषांना जास्त हाेताे

    05-Jun-2023
Total Views |
 
 


Love
 
 
आज प्रेमात फसवणूक हाेण्याचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांचे जास्त आहे. याचा आघात महिलांपेक्षा पुरुषांनाच जास्त भाेगावा लागताे.
जेव्हा प्रेमाविषयी बाेलले जाते तेव्हा त्यातील धाे्नयाविषयीही बाेलले जाते. कारण जिथे निष्ठा आहे, तिथेच विश्वासघातही आहे. पण नेहमी विश्वासघाताचा आराेप मुलांवरच केला जाताे. बहुतांश लाेकांचे असे म्हणणे असते, की मुलेच चंचल असतात. मुली तर प्रेमाला खूपच प्रामाणिकपणे घेतात. म्हणूनच त्यांची प्रेमात फसवणूक हाेते. पण हे सत्य नाही, विशेषत: आजच्या काळात. आकडे सांगतात, की प्रेमात धाे्नयाची शिकार आज महिलांपेक्षा जास्त पुरुष हाेत आहेत आणि या गाेष्टीचा आघात जितका पुरुषांवर हाेताे, तितका महिलांवर हाेत नाही.
 
याबाबतीत ही केवळ एक मान्यता आहे, की महिलाच जास्त संवेदनशील असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की प्रेमभंग झाल्याचे किंवा प्रेमात फसवणूक झाल्याचे दु:ख पुरुषांना महिलांपेक्षा जास्त हाेते. मानसाेपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की पुरुष आपल्या दु:खाला आपल्या आतमध्येच ठेवतात. महिला आपल्या बाेल्नया स्वभावामुळे आपल्या मनातील विचार दुसऱ्यांना सुलभतेने सांगून टाकतात, रडतात, मन हलके करतात. पण पुरुषाच्या आड त्याचे पाैरुषत्व येते. ताे काेणाशी मनातले बाेलू शकत नाही आणि उघडपणे रडूही शकत नाही.इतकेच नाही, तर पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीच्या संपर्कात येताे तेव्हा ताे केवळ स्वत:लाच नाही तर आपले पैसे, आपला वेळ, आपले करिअर पणाला लावत असताे. त्याला स्त्रीला खूश करण्यासाठी सर्व व्यवस्था करावी लागते. तिला आपल्या जवळ ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करावे लागतात. राग बाजूला ठेवावा लागताे. तिला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता द्यावी लागते.
 
त्याचे प्रेम सर्वांच्या नजरेत दिसून येते. प्रेम जेव्हा वाढत असते, तेव्हा पुरुषाची छाती रुंद हाेते. म्हणून ताे प्रेमात फसवणूक झाल्यानंतर स्वत:ला तिरस्कृत आणि अपमानित समजताे.जरी आपला समाज एक पुरुषप्रधान समाज असला, तरी सर्व सहानुभूती महिलांनाच मिळते. पुरुषांकडे उपेक्षित नजरेने पाहिले जाते. हेच कारण आहे प्रेमात फसवणूक झाल्यानंतर एक तर पुरुष आपल्या मेंदूचे संतुलन घालवून बसताे किंवा मग बंडखाेर हाेताे. मग त्याला आपल्या प्रेमिकेवर बदला जरी घ्यावा लागला, तरी ताे काेणाला साेडत नाही. एक तर ताे स्वत:ला समाप्त करण्याचा प्रयत्न करताे किंवा त्या कारणांना ज्यांनी त्याची ही स्थिती केली आहे. महिलांचे प्रेम आणि पुरुषांचे प्रेम यात खूप फरक असताे. पुरुषाचे प्रेम बंडखाेरीही करू शकते.ताजमहाल आज संपूर्ण जगात प्रेमाचे उदाहरण आहे.