पावसाळ्यात गॅझेट्सची घ्यावयाची काळजी

    05-Jun-2023
Total Views |
 
 

Gadgets 
 
पावसाळ्यात स्वतःसाठी रेनकाेट आणि छत्रीची खरेदी करताना आपल्या गॅझेट्सचीही काळजी घेतली पाहिजे. पावसात भिजू नये, त्याने माॅईश्चर पकडू नये म्हणून या काही गाेष्टी करणं आवश्यक आहे.आपण काळजी घेऊनही जर चुकून काही गॅझेट्स भिजली तर काही गाेष्टी मुद्दाम कराव्या लागतात जेणेकरून, त्यातून हाेणारे नुकसान कमी हाेईल. पण काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? पावसाळ्यात माेबाईल सर्वाधिक सांभाळा.कारण, ताे सतत आपल्या बराेबर असताे. आपल्या हातात असताे, खिशात असताे. सतत हाताळला जाताे. पावसाची सर अनुभवायची ओढ तर सगळ्यांना हाेतेच, पण त्या वेळी अनावधानानं माेबाईल भिजू शकताे.
 
त्यामुळे माेबाईल जवळ बाळगायचा असेल आणि पावसाचाही आनंद घ्यायचा असेल तर पारदर्शी प्लॅस्टिकची पिशवी नेहमी साेबत ठेवा. पारदर्शी अशासाठी की, एखादा महत्त्वाचा ाेन आला तर निदान ताे नंबर आपल्याला दिसू शकेल आणि गैरसाेय हाेणार नाही.
पाऊस सुरू असताना आपल्याला मजा करायला आवडेल. सेल्ी काढणं, चॅटिंग करणं याही गाेष्टींचा माेह हाेईल. ताे माेह टाळला पाहिजे.सेल्ी काढताना, आपण पावसात असलाे तरी निदान माेबाईल छत्रीखाली असेल याची काळजी घेतली पाहिजे. चॅटिंग करायचं असेल तर माेबाईल भिजू शकताे, त्यामुळे ते टाळलेलंच बरं.