51 ट्नके मिळाल्याने उंटावरून मिरवणूक

    05-Jun-2023
Total Views |
 
 


Camel
 
 
जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने सर्व विषयांत 35 टक्के गुण मिळवल्याने ताे चर्चेचा विषय ठरला हाेता. आताही अशीच एक घटना समाेर आली आहे. समर्थ सागर जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला व त्याच्या पालकांना जशी दहावीच्या निकालाची उत्सुकता हाेती, तशीच ती त्याच्या मित्रपरिवारालाही हाेती. त्याची अभ्यासातील प्रगती पाहून मित्र त्याला तू नापासच हाेणार अशी हेटाळणी करत हाेते.मात्र आजच्या निकालाने समर्थने दहावीत यश मिळवून आपण पुढच्या शिक्षणासाठी समर्थ असल्याचे सिद्ध केले. समर्थ 51 टक्के गुण मिळवून पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याची भविष्यवाणी करणारे ताेंडावर पडले.
 
समर्थ पास झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी एकच जल्लाेष केला. समर्थची गुलालाने उधळण करत चक्क उंटावरून मिरवणूक काढली. त्यामुळे 95 ते 100 टक्के मार्क मिळवलेले विद्यार्थीही उंटावर बसलेल्या मित्राकडे पाहतच राहिले.काेल्हापूर शहरातील गंगावेस परिसरात मित्रांनी त्याची उंटावरून मिरवणूक काढत जंगी सेलिब्रेशन केले. समर्थ काेल्हापुरातील एस.एम. लाेहिया हायस्कूलमधील विद्यार्थी आहे. मित्रांनी पास हाेणार नाही असे वर्षभर चिडवले, मात्र पास हाेताच मित्रांनीच उंटावरून मिरवणूक काढून त्याचा 51 नंबरी निकाल संस्मरणीय करून टाकला.