आषाढी वारीसाठी चाेख नियाेजन करा : मुख्यमंत्री

    05-Jun-2023
Total Views |
 
 

CM 
 
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चाेख नियाेजन करावे.यंदा वारीसाठी अधिक गर्दी हाेऊ शकते. त्यामुळे वारकऱ्यांना काेणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टाेल माफ करण्यात येईल, अशी घाेषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे, यासाठी विशेष सुविधा करण्याची सूचनाही त्यांनी केली.पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची काेणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाचवरून दहा काेटींची आणि ग्रामपंचायतींसाठी पंचवीसवरून पन्नास लाख अशी दुप्पट तरतूद केली आहे.
 
याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात बैठक झाली. साेलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पुणे विभागीय आयु्नत साैरभ राव, अक्षयमहाराज भाेसले; तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षक आदी अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित हाेते.
 
वारीत सहभागी हाेणाऱ्या वाहनांना टाेल द्यावा लागू नये, यासाठी पाेलिस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमातून कार्यवाही करावी. टाेल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून वारकऱ्यांना टाेल द्यावा लागू नये, असे नयाेजन करावे. पालखी मार्गावरील टाेल नाके सुरू हाेणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.वारीच्या नियाेजनासाठी पालखी मार्ग आणि पंढरपूरसह वारीमार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन नियाेजनाची पाहणी करणार असल्याचे विखे-पाटील, चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विभागीय आयु्नतांनी पालखी मार्ग; तसेच वारीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.