8 वर्षांची छाेकरी उचलते 60 किलाे वजन

    03-Jun-2023
Total Views |
 
 


weightlifting
 
येथील 8 वर्षांची अर्शिया गाेस्वामी नावाची मुलगी 60 किलाे वजनाचे वेटलिफ्टिंग करते. तिची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये मेडल मिळविण्याची महत्त्वाकांक्षा आहे.अर्शिया गाेस्वामी 6 वर्षांर्ची असतानाच तिने 45 किलाे वजन उचलण्याचा विक्रम केला हाेता.इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये तिने नाव नाेंदविले हाेते. ‘माझी मुलगी ऑलिम्पिकपटू मीराबाई चानूकडून प्रेरणा घेते, असे तिच्या आईवडिलांनी सांगितले. अर्शियाला पाॅवर लिफ्टिंगचाही छंद आहे. तिचे वडीलच तिचे फिटनेस ट्रेनर आहेत.