शाकाहार गंभीर राेगांपासून बचाव करताे

    03-Jun-2023
Total Views |
 
 
 
vegetarian
 
याेग्य आहाराची निवड करून विभिन्न प्रकारचे कॅन्सर दूर राखले जाऊ शकतात. दिवसभरात 400 ते 800 ग्रॅम फळे व भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करावा. फास्ट व प्राेसेस्ड फूडस्च्या सेवनापासून दूर राहावे. साखर आणि स्न्ग्धि पदार्थ यांचे कमीतकमी सेवन करावे. अशाच प्रकारे मांस- मासे, मद्यपान, धूम्रपान, पान-मसाला, तंबाखू, अफीम, गांजा इत्यादी मादक पदार्थांपासून दूर राहावे.चहा व काॅफीचे कमीतकमी सेवन करावे.
 
(तीन कपापेक्षा अधिक नकाे) यामुळे हृदयराेग व अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव केला जाईल.आहारामध्ये शाकाहाराला प्राध्यान्य देऊन शरीराचा लठ्ठपणापासून बचाव केला जाऊ शकतारात्रीचे भाेजन आणि सकाळचा नाष्टा यांच्या दरम्यान 12 तासांपेक्षा अधिक अंतर ठेवावे. तूप-साखरेचा उपयाेग करू नये. भाेजनात भाज्या, हिरव्या भाज्या, व सॅलेड यांचे सेवन करावे. दरराेज एक तास व्यायाम करावा, अथवा वेगाने पायी चालावे. यामुळे काही आठवड्यांतच आपले वजन कमी झाल्याचे दिसून येईल.