जपानचे राजदूत हिराेशी यांनी उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

    03-Jun-2023
Total Views |
 
 
 

Japan 
देशातील विशेषतः मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या कामांत जपानचे याेगदान माेठे असून, जपानसाेबतचे सहकार्याचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानचे राजदूत सुझुकी हिराेशी यांनी उपमुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींबाबत उभयतांत चर्चा झाली. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डाॅ. श्रीकर परदेशी या वेळी उपस्थित हाेते.जपानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर राज्यातील अनेक प्रकल्पांत हाेत असून, या माध्यमातून जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक वृद्धिंगत हाेत आहेत, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारत आणि विशेषतः महाराष्ट्राशी विविध क्षेत्रांत संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असल्याचे जपानच्या राजदूतांनी सांगितले.