अपहाेलस्ट्रीचे वाढते महत्त्व

03 Jun 2023 16:02:28
 
 
 

Home 
अपहाेलस्ट्रीचे इंटिरिअरमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे.अपहाेलस्ट्री म्हणजे पडदे, गाद्या, साेफा कव्हर इत्यादी यांना लागणारे कपड्यांचे निरनिराळे प्रकार, ज्यांचा वापर करून इंटिरिअरची शाेभा वाढवली जाते. अपहाेलस्ट्रीचा वापर आपण इंटिरिअरमध्ये अनेक ठिकाणी करताे.आपल्या बेडच्या मागच्या बाजूला हेड बाेर्ड असताे. या हेड बाेर्डना आकर्षक कापड लावले जाते ज्याने बेड रूबाबदार तर दिसताेच पण त्यापेक्षा बेडला कंफर्टही मिळते. या हेड बाेर्डला आपण तासनतास टेकून बसू शकताे. या बेड बॅकला निरनिराळ्या फॅब्रिकचा वापर केला जाताे. यात रेक्झिन, वेलवेट असे अनेक प्रकारचे कापड वापरले जाते. रेक्झिन, पुसायला खूप चांगले असते तसेच डाेक्याचे तेलाचे डाग वगैरे पुसणे साेपे जाते.रूबाबदार लुक अपेक्षित असल्यास वेल्वेट इत्यादी कापडाचा वापर करावा. यात निरनिराळी डिझाइन्स येतात. आडव्या-उभ्या लाइन्स असे वेगवेगळे डिझाईनच्या बेड बॅक बनवले जातात.
 
याला साफ करायचे असेल तर साेफा क्लिनिंग एजन्सीज असतात त्यांच्याकडून ते साफ करून घेऊ शकताे. बेड बॅकची उंची जमिनीपासून चार फूट असते पण त्याला अजून चांगले लुक द्यायचे असेल तर त्याची उंची सहा फूट पण करता येते. यात मेटॅलिक स्ट्राइप्स पण वापरता येतात. गाद्या हा थेट इंटिरिअरशी संबंधित नसला तरी इंटिरिअरमध्ये याला महत्वाचे स्थान आहे. गाद्यांची जाडी त्यातील असणारे मटेरिअल व त्याच्या मऊपणा हा त्याच्या आतल्या फाेमच्या डेन्सिटीवर अवलंबून असताे. साेफ्याच्या फाेमच्या घनतेवर गाद्यांचा मऊपणा अवलंबून असताे, जितकी जास्त घनता तितका कडकपणा जास्त आणि जितकी घनता कमी तितका मऊपणा जास्त. गाद्यांची घनता प्रत्येकाच्या शारीरिक ठेवणीवर अवलंबून असते. काहींना कडक गाद्यांवर शरीराला चांगला आधार मिळताे. तर काही लाेकांना गाद्यांचा मऊपणा अधिक महत्त्वपूर्ण वाटताे. बऱ्याच लाेकांना पाठ व मान दुखीचे त्रास असतात अशा लाेकांनी वरील सर्व बाबींचा विचार करून गादी बनवून घ्यावी.
Powered By Sangraha 9.0