नृत्याने तुमचे जीवन हाेईल आनंदी अन् समाधानी

    03-Jun-2023
Total Views |
 



Dance
 
 
कलेमुळे मनावरील ताण आणि चिंता कमी हाेते; नैराश्य दूर हाेऊन मन प्रसन्न हाेतेकलेची ओढ माणसाला नैसर्गिक असते. कला काेणताही असली, तरी ती आपल्या जीवनाला समृद्ध करते हे निश्चित; पण जीवनाला ताला-सुरात आणण्यासाठी नृत्य फार उपयाेगी पडत असल्याचे विविध संशाेधनांतून समाेर आले आहे. लहान मुलांकडे पाहिलेत, तर तुमच्या ते लक्षात येईल.काेणतेही गाणे कानी पडताच मुलांच्या पायांची हालचाल सुरू हाेते. रस्त्यावरून जाताना गाण्याचे सूर ऐकले, तरी काही मुलांचे पाय नाचायला लागतात. आपण कसे नाचताेय आणि लाेक काय म्हणतील, हे मुद्दे मुलांच्या बाबतीन गाैण असतात.प्राैढांचे तेच हाेते. ढाेलांच्या तालावर न कळत पाय थिरकायला लागतात. लग्नाच्या वरातीत लाेक किती नाचतात, हे आपण पाहताे. हे काेणी नाचाचे शिक्षण घेतलेले नसतात. त्यांची एक स्टाइल असते आणि ते ती वापरतात. नृत्यामुळे तणाव दूर हाेऊन समाधान मिळत असल्याचे आढळले आहे.
 
संशाेधने काय सांगतात?: नृत्याचा फायदा काय, हे पाहण्यासाठी स्वीडनमधील ओरेब्राे विद्यापीठातील मानसाेपचार तज्ज्ञांनी 2013मध्ये एक प्रयाेग केला. तणाव, नैराश्य आणि चिंतेच्या विकारांनी पीडित असलेल्या किशाेरवयीनांची निवड या प्रयाेगासाठी केली गेली. या मुलांमध्ये खांदा आणि पाठीत वेदनांची ‘सायकाेसाेमेटिक डिसऑर्डर’ ही लक्षणेही हाेती.या गटातील निम्म्या मुलांना आठवड्यातून दाेनदा नृत्याच्या वर्गाला जाण्यास सांगितले गेले आणि उरलेल्यांना राेज जाण्यास सांगितले गेले. दाेन वर्षांच्या कालावधीनंतर, राेज नृत्याच्या वर्गाला गेलेल्या मुलांमधील ‘सायकाेसाेमॅटिक’ लक्षणे कमी झाल्याचे आढळले. ही मुले जास्त खुशीत असल्याचेही दिसले.
 
नृत्याचा फायदा फ्नत शरीर आणि मेंदूलाच हाेत नाही, तर दैनंदिन जीवनातसुद्धा हाेताे.ऑस्ट्रेलियातील संशाेधकांनी या संदर्भात एक हजार लाेकांबराेबर चर्चा केली तेव्हा नृत्य हा जीवनाचा भाग झालेले लाेक जीवनाबाबत संतुष्ट असल्याचे आणि त्यांचे सर्वांबराेबरचे संबंध साैहार्दाचे असल्याचे दिसले. या लाेकांनी त्यांची उद्दिष्टेही गाठली हाेती. काेणत्या ना काेणत्या कलेशी संबंधित असलेल्या लाेकांना तणावाबराेबर सामना करणे सुलभ जात असल्याचे याॅर्कशायर आणि लिड्स या विद्यापीठांनी केलेल्या संशाेधनांतही आढळले.
 
संप्रेरके घडवितात बदल: नृत्य केल्यामुळे अथवा नाचल्यामुळे शरीरात ‘एण्डाॅर्फिन’ हे संप्रेरक स्रवते आणि त्यामुळे मेंदूचे कार्य अधिक चांगले चालते. तणाव दूर करून मूड चांगला करण्याचे काम हे संप्रेरक करते. त्यातून मानसिक शांतता मिळते. वेदना आणि तणाव या संप्रेरकामुळे दूर हाेत असल्याने शारीरिक आराेग्य सुधारते; तसेच मनातील चिंता आणि नैराश्यही दूर हाेते.
 
स्वत:ला स्वत:शी जाेडण्याचे काम: नृत्य हा केवळ शारीरिक व्यायाम नसून, ताे आध्यात्मिक अभ्याससुद्धा असताे. या अभ्यासामुळे आपल्याला आपल्या अंत:करणात डाेकावता येते.ढाेलाचा आवाज निनादू लागताच लाेक नाचायला लागतात. त्यात त्यांची स्टाइल असते आणि ढाेलाच्या तालावर लाेक एवढे नाचतात, की त्यांना थकव्याची जाणीवही हाेत नाही. हाच काळ आपण आपल्यात रमण्याचा असताे. नाचत असताना आपल्या मनात कसलीही भीती नसते, विचार नसतात, भविष्याची चिंता नसते आणि आपण कसे नाचताे आहाेत, याची जाणीवही नसते. आपण केवळ शरीर हलवित असताे आणि स्वातंत्र्य अनुभवताे.
 
नृत्याच्या माध्यमातून आपल्याला दिव्यता, साैंदर्य आणि श्नतीची जाणीव हाेते. उपचारांप्रमाणे फायदा:तळीवर हा उपाय केला जाताे. नृत्याेपचारामुळे (डान्स थेरपी) मानसिक तणाव दूर हाेऊन एकाग्रता वाढते आणि त्याचा फायदा शारीरिक आराेग्याला हाेताे. नृत्याद्वारे विकारांवर उपचार करण्याच्या पद्धतीला ‘डान्स मूव्हमेंट थेरपी’ म्हणतात. याचा उपयाेग नैराश्य, हृदयविकार, सांध्यांचे विकार, ऑस्टाेओपाेराेसिस आणि स्मृतिभ्रंशासारख्या विकारांवर उपचार करण्यासाठी केला जाताे.प्रत्येक घटनेची काळजी वाटणे आणि मनावर ताण येणे हे सध्याच्या वेगवान आयुष्याचे अपरिहार्य घटक झाले आहेत.