ठरविलेले हुकले, तरी निराशेला नकाे थारा

    02-Jun-2023
Total Views |
 
 

hope 
 
आपण एखाद्या गाेष्टीसाठी खूप प्लॅन केला आणि नंतर ती गाेष्ट तशीच घडताना दिसली नाही असे आपल्यासाेबत घडले असेल. अशा वेळी आपण काय करताे? बहुधा निराश हाेताे. आपण जसे अपेक्षित केले असते तसे आयुष्यात घडले नाही तर निराशा दाटून येते.
सामना सुरू हाेण्याआधीच खेळाडूने हारलेल्या मनः स्थितीत यावे तसे काही तरी हाेते.वास्तविक, आपल्यापैकी अनेकांना प्लॅन ए साेबतच प्लॅन बी किंवा प्लॅन सी देखील तयार ठेवण्याचे महत्व माहिती असते. जेंव्हा पहिला प्लॅन अडचणीत येताे तेंव्हा प्लॅन बी हा देखील आपल्याला तितकाच आनंद देऊशकताे. मात्र, अनेकदा आपण पहिल्याच याेजनेच्या विचारात इतके गुंगून जाताे की दुसऱ्या याेजनेचा विचारच मनात येत नाही.
 
एक उदाहरण पाहू. एखादा आनंदसाेहळा ठरलेला असताे. त्या दिवशी त्या ठरलेल्या वेळी तिथे जाणे आपण निश्चित करताेच. तिथे गेल्यावर काय करायचे याचे बारीकसारीक प्लॅन देखील करून ठेवताे. कुणाशी भेटायचे, कसे फाेटाे घ्यायचे असे सगळे निश्चित करताे.मात्र या सगळ्या गडबडीत आपण काही महत्वाच्या गाेष्टी, उदाहरणार्थ त्या साेहळ्याच्या वेळेची खात्री करणे विसरून जाताे. आपण स्वतःच्या मनात जी वेळ गृहित धरली असते त्या वेळी तिथे पाेचताे. साहजिकच आपण ज्या क्षणासाठी उपस्थिती आवश्यक धरलेली असते असा क्षण उलटून गेलेला असताे. जेंव्हा आपल्या लक्षात ते येते त्यावेळी साहजिकच आपल्या मनामध्ये खूपच निराशा दाटून येते.
 
वास्तविक, तिथे करण्यासारख्या इतरही गाेष्टी असतात. अनेक लाेक तिथे असतात. त्यांच्याशी बाेलता येते. काही गाेष्टी जाणून घेता येतात. मात्र अनेकांना निराशेच्या त्या क्षणी इतर काही सुचत नाही. नंतर कुणी विचारले तर इतर काही करायचे सुचले कसे नाही याचे आपल्यालाही आश्चर्य वाटू शकते.असे घडताना नेमके काय हाेते? तज्ज्ञ म्हणतात की, आपल्याला सगळेच माहिती आहे ही मनाेवृत्ती त्यामागे काम करते. आपल्याला सगळे माहिती असल्याने सगळे आपल्या मनासारखेच हाेणार हे गृहित धरून पुढचा सगळी याेजना आपल्या मनात आकाराला येते.खरे तर, आपण स्वतःला नेहमी जितके परिपूर्ण जाणकार मानताे तितके दर वेळी नसताे. हा त्यातला एक भाग.