व्यायामाचे ायदे अनेक, हवे फक्त सातत्य

    02-Jun-2023
Total Views |
 
 

exercise 
 
जेवणानंतर काही तास व्यायाम करू नये. जेवल्यानंतर 1-2 तास विश्राम (एेंद्रिय) चेतासंस्था कार्यक्षम हाेते व स्नायूंना लागणारी चेताप्रणाली संथ हाेते. म्हणून जठरात अन्न असेपर्यंत वेळ जाऊ द्यावा.व्यायाम करून काय पैलवान व्हायचे आहे का, असाही बिनताेड सवाल केला जाताे. पण पैलवान व्हायचे असेल तरच व्यायाम करायचा असताे हे आळशांचे विधान आहे.व्यायाम करायचा ताे निराेगी आणि दीर्घायुषी हाेण्यासाठी.पैलवान व्हायचे तर बराच व्यायाम लागताे, त्याची सर्वांना गरज नसते. त्यामुळे चालू-िफरू शकणाऱ्या प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे.
 
कष्ट करणाऱ्यांना व्यायामाची गरज नाही हे अर्धसत्य आहे.- कष्ट काेणत्या प्रकारचे/किती असतात यावर अवलंबून आहे. कष्टामध्ये विशिष्ट स्नायुगटांना व्यायाम मिळत असताे.इतर अंगे दुर्लक्षित राहतात, ती व्यायामात आली पाहिजेत.उदा. लवचिकतेसाठी काही व्यायाम करावे लागतील.चालण्याने चांगला आहे. तरण्याताठ्या लाेकांनी वेगळा व जास्त व्यायाम केला पाहिजे. भरभर चालणे हा मात्र चांगला व्यायाम आहे. तसेच 6 कि.मी च्या वर चालणे झाले तरच त्याला व्यायाम म्हणून अर्थ आहे. एक-दाेन कि.मी. चालण्याला फारसे महत्त्व नाही.चालणं हा एक उत्तम व्यायाम जरूर आहे पण त्यामध्येही काही नियमांचं पालन करायला हवं .
 
तुमच्या खांद्याच्यामध्ये डाेकं सरळ ठेवून सरळ दिशेने चाला. हात सरळ आणि खांदे ताठ ठेवून चालणं फायदेशीर ठरतं. चालताना पाय उचलून जमिनीवर ठेवा. पाय ठेवताना सर्व प्रथम तुमची टाच जमिनीला टेकवून नंतर टाचेपासून पायाच्या बाेटांपर्यंत संपूर्ण पाय टेकवा.या पद्धतीने चाललात तर चालण्याचा त्रास हाेत नाही. चालणं नैसर्गिक असून ते साेपं आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी दरराेज साधारण अर्धा तास चालण्याचं ध्येय निश्चित करा. जर तुम्ही वजन कमी करायचं ठरवलं असेल तर कॅलरीज जाळण्यासाठी राेज एक तास चालणं अत्यंत गरजेचं आहे. वजन कमी करण्याचा किंवा राखण्याचा चालणे हा उत्तम मार्ग आहे.आठवड्यातून तीन ते चार वेळा विशेषत: सकाळी 20 ते 30 मिनिटे न थांबता चालल्यास आराेग्यासाठी उत्तम आहे.