जगाच्या दक्षिण भागातील शेवटचे पाेस्ट ऑफिस

    02-Jun-2023
Total Views |
 
 

Post 
अर्जेटिनामधील पातागाेनिया नॅशनल पार्कमध्ये समुद्र किनाऱ्यावर चारी बाजूला स्टिकर्स लावलेले लाकूड व मेटल वापरून तयार केलेली झाेपडी आहे. ही झाेपडी जगाच्या दक्षिण भागातील शेवटचे पाेस्ट ऑफिस आहे. या झाेपडीचा मालक कार्लाेच या पाेस्ट ऑफिसमध्ये पाेस्टमास्तर आहे. येथे एम्बेसी ऑफ रेडाेन्डा असा बाेर्ड आहे. रेडाेन्डा हे छाेटेसे बेट आहे. कार्लाेस या बेटाचा मालक आणि पंतप्रधान आहे. या भागातील पत्रांवर अर्जेटिनाचा व रेडाेन्डाचा असे पाेस्ट ऑफिसचे दाेन श्निके मारण्यात येतात.