वारकरी भवनासाठी अतिर्नित 15 काेटी देणार: मुख्यमंत्री शिंदे यांची घाेषणा

10 Jun 2023 14:35:52
 
 

varkari 
 
वारकरी संप्रदाय राज्याचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवड्यात उभारण्यात येणाऱ्या आगरी काेळी वारकरी भवनासाठी आता 15 काेटींचा निधी देण्यात आला आहे. भवनाच्या कामासाठी अतिर्नित 15 काेटी रुपये देण्याची घाेषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.दिवा शहरातील बेतवडे येथे ठाणे महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या आगरी काेळी वारकरी भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बाेलत हाेते. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, माजी महापाैर नरेश म्हस्के, माजी उपमहापाैर रमाकांत मढवी, जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे, ठाणे पालिकेचे आयु्नत अभिजित बांगर, वारकरी संप्रदायाचे जितेंद्र महाराज, चेतन महाराज घागरे, बाळकृष्ण महाजन पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे, विनायक महाराज, जयेश महाराज भाग्यवंत यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, बेतवड्याचे नागरिक या प्रसंगी उपस्थित हाेते.
 
वारकरी भवनासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. पालिकेमार्फत हे भवन उभारण्यात येणार आहे. संतसावळाराम महाराज स्मारकासाठी जागा आणि निधी देण्यात येईल; तसेच आगरी काेळी वारकरी भवनाला सावळाराम महाराजांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ठाणे, दिवा, कल्याण परिसरात आगरी, काेळी व वारकरी माेठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्यासाठी हे भवन उभारण्यात येत आहे. येत्या वर्षभरात हे वारकरी भवन उभे राहील. या वास्तूत आगरी काेळी संस्कृतीचे दर्शन घडेल. कल्याणला संत सावळाराम स्मारकासाठी जागा अंतिम झाली असून, लवकरच त्याचे भूमिपूजन हाेईल, असे डाॅ. शिंदे यांनी सांगितले. या वेळी बेतवडे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0