मध्ययुगीन काळात प्रचलित असलेली एक वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती. हे नाव यादव काळातील हेमाद्री ऊफर् हेमाडपंत याच्या नावावरून आले आहे.हेमाद्री हा यादव राजा महादेव (कारकिर्द 1261-70) आणि नंतर यादव राजा रामदेवराव (कारकिर्द 12711311) याच्या पदरी मंत्री हाेता, त्यावरून रूढ झाले आहे. हेमाडपंताने अनेक मंदिरे बांधली आणि मंदिर-बांधणीस प्राेत्साहन दिले. हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ त्याने सुमारे तीनशे मंदिरे बांधली असावीत, अशी वदंता-परंपरा आहे.हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयाेग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली. मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे.
सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडामध्ये चुना किंवा त्याप्रकारचे मटेरियल दगडांमधील दरजा भरण्यासाठी न वापरता दगडच वेगवेगळ्या काेनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील, अशी रचना केली जाते. मंदिरासारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत दगड एकमेकांत गुूंन केलेली ही रचना एकसंध उभी राहते आणि टिकाऊही बनतेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिरही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे आहेत.मंदिरांच्या शिखरांची घडण हे यांचे मुख्य वैशिष्ट््य. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच प्रकारची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक बनते.
(आमलक : आवळा). प्रमुख दिशांना काेन येतील असा चाैरस कल्पून एका काेनासमाेर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या या इमारतींच्या पायांची आखणी अनेक काेनबद्ध असते.शिखराच्या छाेट्या छाेट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर बसवल्यावर ही सर्व लहान लहान शिखरे रचूनच माेठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते.तळापासून कळसापर्यंत केलेल्या भित्तिकाेनांच्या रेषांमुळे भासणारा बांधणीचा उभटपणा वेगवेगळ्या थरांच्या अडवटींनी कमी झाल्यासारखा वाटताे.कालदृष्ट््या या मंदिरांचे दाेन स्वतंत्र भाग पडतात.
एक, सुरुवातीची अकराव्या ते तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत बांधलेली मंदिरे आणि दाेन, इ. स. 12501350 दरम्यान बांधलेली मंदिरे. सुरुवातीच्या मंदिरांवर विपुल प्रमाणात शिल्पांकन असून, नंतरच्या मंदिरांवर ते क्रमशः तुरळक झाले आहे व अखेरीस शिल्पांकन क्वचित आढळते. त्यांना रूढार्थाने हेमाडपंती म्हणता येईल. वस्तुतः ही सर्व मंदिरे वास्तुशिल्पशैलीच्या दृष्टीने माळव्यातील भूमीज या उपवास्तुशैलीतून उत्क्रांत झालेल्या नागरशैलीत बांधलेली आहेत.ही शैली नागर आणि द्राविड यांहून काहीशी भिन्न असून, प्रथम यादव व शिलाहार वंशांतील राजांनी ती विकसित केली. पुढे त्यांत हेमाडपंत या यादवांच्या मंत्र्याने काही बदल केले.