गीतेच्या गाभाऱ्यात

10 Jun 2023 14:41:28


पत्र एकाेणिसावे

Bhagvatgita
आमच्या शाळेला या आनंदाप्रीत्यर्थ सुट्टी देण्यात आली.शाळेचे सुपरिन्टेंडंट, पाटीलशास्त्री व माझे सहाध्यायी माझ्या घरी आले व त्यांनी माझे अभिनंदन केले.लाेक अभिनंदन करत हाेते; पण माझ्या डाेळ्यात पाणी येत हाेते. मला वाटत हाेतं- आईची इच्छा पूर्ण झाली. मी शंकरशेठ आलाे. पण, आता आई मला साेडून जाणार! ओ्नसाबाे्नशी रडत मी आईच्या पाया पडलाे व म्हटले- ‘आई! तू सांगशील ते मी करताे, पण मला तू साेडून जाऊ नकाेस ग!’ माझ्या जीवनातील हाच ताे अविस्मरणीय प्रसंग. असाे.बाकीचा मजकूर पुढील पत्रात तुझा राम

* * * पत्र विसावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. महाभारतकार व्यासांना अठरा हा आकडा फार प्रिय आहे हे समजून तुला माेठी गम्मत वाटली.एखाद्याला एखाद्या आकड्याचे फार आकर्षण असते.व्यासांच्या बाबतीत अठरा आकड्याला फार महत्त्व आहे.महाभारताचे पर्व अठरा. गीतेचे अध्याय अठरा.दाेन्हीकडील सैन्य अठरा अक्षाैहिणी. गीतेच्या पहिल्या अध्यायात पांडवांच्या कडील महारथी वीरांची नावे दिली आहेत. ती आहेत अठरा.विशेष गंमत अशी की ही नावे ज्या श्लाेकात संपली आहेत ताे श्लाेक आहे अठरावा.त्यापेक्षाही विशेष गंमत अशी आहे की, तस्मात् युद्धस्व भारत हाच गीतेचा महान संदेश आहे. हा संदेश ज्या श्लाेकात दिला आहे ताे श्लाेक देखील आहे अठरावा.तुला जर्मन बादशहा चाैथा चार्लस ऐकून माहीत असेल.

त्याला चार आकडा फार प्रिय हाेता.ताे चार रंगी पाेषाख करायचा. जेवताना ताे चारच पदार्थ घ्यायचा. आपल्या रथाला ताे चार घाेडे जुंपायचा. त्याने आपल्या राजवाड्यात चार दालने केली हाेती. आपल्या देशाचे त्याने चार भाग केले हाेते. त्याने आपल्या सैन्याचे चार भाग केले हाेते.सर्वांत आश्चर्याची गाेष्ट म्हणजेताे चार वाजून चार मिनिटांनी मेला! तू जाे प्रश्न विचारला आहेस त्याचे उत्तर असे की, मनुष्य कितीही माेठा झाला, तरी ताे नेहमीच उच्च भावावस्थेत असताे असे नाही. केव्हा केव्हा ताे अतीव उच्च अवस्थेत जाताे व त्यावेळी ताे जे बाेलताे ते- हिऱ्याच्या लेखणीने माेत्याच्या शाईने साेन्याच्या कागदावर लिहिण्याच्या याेग्यतेचे असते.गीता सांगणेचे वेळी भगवान कृष्ण अशा उच्च अवस्थेत हाेते, म्हणून गीतेला फार माेठी किंमत आली आहे.भारतीय युद्ध संपले. युधिष्ठिर गादीवर बसला. सगळं स्थिरस्थावर झालं मग कृष्ण अर्जुनाला म्हणाला - ‘आता मी द्वारकेला जाताे’ अर्जुन म्हणाला -
Powered By Sangraha 9.0